शाहू महाराजांना वंचितचा पाठिंबा - आंबेडकर

प्रकाश आंबेडकर यांचा महाविकास आघाडीसोबत एकत्र लढण्याचा निर्णय झालेला नाही.
शाहू महाराजांना वंचितचा पाठिंबा - आंबेडकर

कोल्हापूर : काँग्रेसकडून कोल्हापूरच्या लोकसभा मतदारसंघाच्या जागेसाठी शाहू महाराज छत्रपती यांच्या नावाची घोषणा झाली आहे. त्यांना ‘वंचित’ आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दिल्याचे जाहीर केले. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मोठी घोषणा केली. प्रकाश आंबेडकर यांचा महाविकास आघाडीसोबत एकत्र लढण्याचा निर्णय झालेला नाही. आंबेडकर म्हणाले की, शाहू महाराजांची विचारसरणी आणि त्यांचे चळवळीच्या जवळचे कुटुंब असल्याचे आम्ही मानतो. तीनही ठिकाणी निर्णय घेण्यात आला आहे की, पक्षाच्या वतीने त्यांना आमचा पाठिंबा आहे. त्यांना निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून जे प्रयत्न करावे लागतील ते सर्व प्रयत्न केले जातील. त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा आहे, असे ते म्हणाले.

महाविकास आघाडीचे विचारणार असाल तर तो तिढा तुम्ही त्यांनाच विचारा. कारण आम्हाला त्याबाबत माहिती नाही. दुसरे ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी नवा पक्ष नोंदणी केला आहे. त्यांनी एक लिस्ट आमच्याकडे सादर केली. तेव्हा त्यांना आम्ही सांगितलंय की, आमचंच घोंगडं भिजत पडलेलं आहे. ते मिटल्याशिवाय आम्ही आपल्याशी बोलू शकत नाही किंवा निर्णय घेऊ शकत नाही. आमच्यात दीड तास चर्चा झाली. ते कोणत्या मतदारसंघासाठी इच्छुक आहेत याची माहिती आम्ही घेतली.

महाविकास आघाडीचाच तिढा सुटलेला नाही

ते म्हणाले की, तुम्ही आम्हाला सहकार्य केले असते तर कदाचित जे घोंगडं भिजतंय ते भिजले नसते. तुम्ही सर्वांनी आम्हाला टार्गेट केले. म्हणून त्यांना त्यांचे कोंबडे झाकता आले. त्यांचे कोंबडं आता बांग द्यायला लागले आहे. १० जागांवर शिवसेना आणि काँग्रेस यांचा दावा आहे. ५ जागांवर राष्ट्रवादी-शिवसेना आणि काँग्रेस असा वाद आहे. तुम्ही आम्हाला प्राधान्य दिले असते तर तिढा राहिला नसता. त्यांचे भांडण मिटत नसल्यास आम्ही त्यात कुठे मध्ये पडायचे. त्यांच्यात आजही तिढा सुटला आहे असं सांगण्यात आलेले नाही, असे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in