पुण्यात ‘वंचित’कडून वसंत मोरे रिंगणात

वंचितकडून महाविकास आघाडीसोबत मैत्रीपूर्ण लढत होत असल्याचे दिसत आहे. यापूर्वी वंचितकडून कोल्हापूरच्या शाहू महाराजांना आणि गडकरींचे विरोधक उमेदवार काँग्रेसचे विकास ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे.
पुण्यात ‘वंचित’कडून वसंत मोरे रिंगणात
Published on

मुंबई : ‘वंचित आघाडी’ने पुण्यातून वसंत मोरेंना लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे तर बारामतीत सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिला आहे.

वंचितकडून महाविकास आघाडीसोबत मैत्रीपूर्ण लढत होत असल्याचे दिसत आहे. यापूर्वी वंचितकडून कोल्हापूरच्या शाहू महाराजांना आणि गडकरींचे विरोधक उमेदवार काँग्रेसचे विकास ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे.

‘वंचित’ने तिसऱ्या यादीत नांदेडमधून अविनाश बोसिरकर, परभणीतून बाबासाहेब उगळे, छत्रपती संभाजीनगरमधून अफसर खान, पुण्यातून वसंत मोरे आणि शिरूरमधून मंगलदास बागूल यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in