मुंबईहून सोलापूरकडे जाणाऱ्या ‘वंदे भारत’चा डबा रुळावरून घसरला; पुणे रेल्वे स्थानकाजवळ अपघात

मुंबईवरून सोलापूरकडे जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला आज सायंकाळी पुणे रेल्वे स्टेशनजवळ अपघात झाला.
पुणे रेल्वे स्थानकावर अपघात; मुंबईहून सोलापूरकडे जाणाऱ्या ‘वंदे भारत’चा डबा रुळावरून घसरला
पुणे रेल्वे स्थानकावर अपघात; मुंबईहून सोलापूरकडे जाणाऱ्या ‘वंदे भारत’चा डबा रुळावरून घसरला
Published on

पुणे : मुंबईवरून सोलापूरकडे जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला आज सायंकाळी पुणे रेल्वे स्टेशनजवळ अपघात झाला. रेल्वेचा कोच नं सी १५ रुळावरून घसरला. पुणे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म नंबर तीनवर ट्रेन येत असताना हा अपघात झाला, त्यामुळे काही काळ प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरले होते. मात्र, ट्रेनमधील सर्व प्रवासी सुखरुप आहेत.

ही गाडी पुणे स्थानकात सायंकाळी सुमारे साडेसातच्या सुमारास प्लॅटफॉर्ममध्ये प्रवेश करत असताना डायमंड क्रॉसिंगवर चौथ्या डब्याचा एक ट्रॉली घसरला. पुणे स्थानकाच्या यार्ड रिमॉडेलिंग अंतर्गत या क्रॉसिंगच्या उन्नतीकरणाचे काम नियोजित आहे, तेव्हा ट्रेनला किरकोळ अपघात झाला. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नाही. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. त्यांना दुसऱ्या रेकमध्ये हलविण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in