हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा दिमाखात

किल्ले रायगडाच्या पायथ्याशी 1 जून ते 7 जून या काळात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा दिमाखात

अवघ्या महाराष्ट्रच काय तर देशाचा उर अभिमानाने भरून यावा असा आजचा दिवस आहे. आज महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला म्हणजेचं शिवराज्याभिषेकाला तिथीनुसार 350 वर्ष पुर्ण होत आहेत. 350 वर्षापूर्वी आजच्या दिवशी दख्खन देशाचे स्वामी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजधानी किल्ले राजगडावर दिमाखात शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला होता.

या निमित्तानं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आज स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडाच्या पायथ्याशी 1 जून ते 7 जून या काळात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी शासनाकडून 350 कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आली आहे. आज 2 जून रोजी सकाळच्या सुमारास या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी त्यांनी "शिवाजी महाराजांनी स्वराज्य, धर्म, संकृती यांना धक्का पोहोचवणाऱ्यांना इशारा दिला. यामुळे जनतेत दृढ आत्मविश्वास वाढला. शिवाजी महाराजांचे इतके पैलू आहेत की, कोणत्या नाकोणत्या रुपात त्यांचं जीवन आपल्याला प्रभावित करतं", असं म्हटलं.

या सोहळ्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लंडनमधील भवानी तलवार आणि वाघनखं राज्यात परत आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं सांगितंल. यासाठी राज्याचे मंभी सुधीर मुनगंटीवार प्रयत्न करत असून पंतप्रधान मोदी देखील यामध्ये आपल्याला मदत करणार असल्याचं ते म्हणाले. तसंच या नेत्रदिपक सोहळ्याला हजारो शिवभक्कांची उपस्थिती असून अनेक राजकीय व्यक्तीमत्व देखील हजर आहेत. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सुनील तटकरे, राम शिंदे अशा नेत्यांची या कार्यक्रमाला उपस्थिती आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर या सोहळ्याला सहकुटुंब उपस्थिती लावली आहे.

या सोहळ्यासाठी रायगडाव फुलांची आरास करण्यात आली आहे. रायडावरील महाराजांच्या पुर्णकृती पुतळ्याला देखील फुलांनी सजवण्यात आलं आहे. तर महाराजांचा बसलेल्या स्थितीतील चांदीच्या पुतळ्याला पालखीसाठी सजवण्यात आलं आहे. शिवभक्तांच्या आरोग्याची यावेळी पुर्णपणे काळजी घेण्यात आली आहे. यासाठी रायगडावर 10 हजार लिटर तर गडाच्या पायथ्याशी 40 हजार लिटर पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवभक्तांसाठी गड चढतांना ठिकठिकाणी वैद्यकीय सुविधा उपलब्ध केल्या आहेत. यासाठी 25 वैद्यकीय केंद्रं, बेड्स, रुग्णवाहिका यांचा समावेश आहे. शिवभक्तांनांसाठी दळणवळणाची सोय देखील सरकारने उपलब्ध करुन दिली आहे. शिवप्रेमींची ने-आण करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या 150 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. वाहनतळापासून ते पाचाड नाक्यापर्यंत निशुक्ल पद्धतीने ही सेवा असणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in