"मला वंचितच्या कार्यकर्त्यांनी..." वसंत मोरेंनी सांगितलं ठाकरे गटातील प्रवेशामागचं कारण

"ऑफिस फोडण्याऐवजी पक्षासाठी काम केलं असतं, तर पक्ष वाढला असता..." वसंत मोरेंनी कुणाला लगावला टोला?
"मला वंचितच्या कार्यकर्त्यांनी..." वसंत मोरेंनी सांगितलं ठाकरे गटातील प्रवेशामागचं कारण
Published on

मुंबई: वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीला सोडचिट्ठी दिली असून ते ९ जुलै रोजी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. वंचितच्या अनेकांनी मला स्वीकारलं नाही तसेच वंचितच्या अनेकांनी निवडणुकीत माझं काम केलं नाही, असा आरोप वसंत मोरे यांनी केला आहे. दरम्यान वंचितचे कार्यकर्ते सरोदे यांनी वसंत मोरे यांचं ऑफिस फोडण्याचा इशारा दिला आहे. त्यावरही वसंत मोरे यांनी प्रतिक्रिया दिली. ऑफिस फोडण्याऐवजी पक्षासाठी काम केलं असतं, तर पक्ष वाढला असता, असा टोलाही वसंत मोरेंनी लगावला.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीपूर्वी वसंत मोरे यांनी मनसेतून वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी वंचितमधून लोकसभा निवडणूकही लढवली. या निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर आता वसंत मोरे शिवसेना ठाकरे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकिय विश्वात सुरु आहे. या पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांनी काल (बुधवारी) दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मुंबईतील मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली. दरम्यान काल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वसंत मोरे यांच्या उद्धव ठाकरेंच्या भेटीमागचं कारण स्पष्ट केलं होतं. वसंत मोरे लवकरच शिवसेनेत (ठाकरे गटात) प्रवेश करतील, असं संजय राऊत म्हणाले. त्यानंतर ९ जुलै रोजी वसंत मोरे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

वसंत मोरे म्हणाले की, "मला वाटतं होतं की, वंचित बहुजन आघाडीमधून पुणे शहरामध्ये चांगलं काम उभं करता येईल, चांगली संधी आहे. परंतु वंचितमध्ये मला जे यश मिळायला हवं होतं, परंतु वंचितमधील कार्यकर्ते, पदाधिकारी, मतदारांनी स्विकारलं नाही. शेवटी पाठीमागं असणाऱ्या लोकांचाही विचार घ्यावा लागतो. त्यानंतर मी संजय राऊत यांच्या मार्गदर्शनानुसार उद्धव ठाकरेंची भेट घेतली. ९ जुलैला माझा प्रवेश निश्चित झालाय. मातोश्रीला जाऊन मी प्रवेश घेणार आहे."

logo
marathi.freepressjournal.in