मुरबाडमध्ये वाहन-मोटारसायकल अपघात

या रस्त्याविरोधात अनेक आंदोलने, उपोषणे झाली
मुरबाडमध्ये वाहन-मोटारसायकल अपघात

मुरबाड : गेले दहा वर्षे अर्धवट लालफितीत असलेला शहापूर, मुरबाड, म्हसा, कर्जत रस्त्यावर एका बाजूला खोदलेल्या रस्त्यावर चारचाकी वाहनाने दुचाकी वाहनस्वारांना धडक दिल्याने aमोटारसायकलवरील दोघे जखमी झाले आहेत.

सदरची घटना म्हसा यात्रेच्या दरम्यान घडल्याने यात्रेत येणाऱ्या भाविकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शहापूर, मुरबाड, कर्जत रस्त्याचे पोट ठेकेदार निलेश सांबरे हे रस्त्याचे काम करत होते, त्यांनी रस्त्याचे काम अर्धवट टाकून पोबारा केल्याची चर्चा आहे. त्याविरोधात केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार केली असताना अद्याप रस्ता पूर्ण झालेला नाही.

मुरबाड, पवाळे, कुडवली, तीन हात नाका मुरबाड, सासणे, म्हसा, पाठगाव परिसरात गेले कित्येक महिने रस्ता खोदून अर्धवट सोडून दिला आहे तेथे नेहमी अपघात होतात. याकडे महाराष्ट्र व केंद्र सरकार दुर्लक्ष करत असल्याने स्थानिकांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या रस्त्याविरोधात अनेक आंदोलने, उपोषणे झाली, मात्र ठेकेदारावर कोणतीही कारवाई झालेली नसल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in