पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी बेमुदत संपावर; ४ हजार विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाबाहेर ठिय्या

आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यतील सहाही पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी बेमुदत संपावर गेले असून महाविद्यालयीन शिक्षण तसेच महाविद्यालयांना जोडलेल्या पशू चिकित्सालयांवरही विद्यार्थ्यांनी बहिष्कार टाकला आहे.
पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी बेमुदत संपावर; ४ हजार विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाबाहेर ठिय्या
Published on

कराड : आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यतील सहाही पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी बेमुदत संपावर गेले असून महाविद्यालयीन शिक्षण तसेच महाविद्यालयांना जोडलेल्या पशू चिकित्सालयांवरही विद्यार्थ्यांनी बहिष्कार टाकला आहे. यामध्ये साताऱ्यातील खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय देखील समाविष्ट असून एरवी गजबजलेले असलेल्या या महाविद्यालयासमोर गेले दोन दिवस शुकशुकाट पसरला आहे.

आपल्या मागण्यांचे दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे, राज्यातील सर्व सहाही महाविद्यालयातील एकूण ४००० विद्यार्थ्यांनी गेल्या १ ऑगस्टपासून बेमुदत संप पुकारला असून राज्य सरकार खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी देत असल्याने भविष्यात बेरोजगारांची नवी फौज सरकारला उभी करायची आहे का? असा प्रश्न विद्यार्थ्यांद्वारे विचारण्यात आला. या आंदोलनामुळे सर्व ठिकाणी पशुचिकित्सालयांची सेवा पूर्णपणे ठप्प झालेली असून पशू उपचारांसाठीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. बिहार, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश या राज्यांमध्ये एकही खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय नसताना महाराष्ट्रात खासगी महाविद्यालयाची खरच गरज आहे का? असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारण्यात येत आहे. सध्या राज्यात एकूण सहा शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालये व तीन नियोजित शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालये सुरू होणार असणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. असे असतानाही नियोजित पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू न करता खासगी महाविद्यालयांना परवानगी देण्याचा उद्देश काय? असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून निवेदनात उपस्थित केला आहे. त्यामुळे शासनाने खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी देऊ नये अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

भविष्यात बेरोजगारांची नवीन फौज

महाराष्ट्रात जवळपास साडेतीन कोटी पशुधन असताना त्यासाठी शासनाच्या नियमाप्रमाणे ६ हजार पशुचिकित्सकांची आवश्यकता आहे परंतु सध्या जवळपास साडेदहा हजारांपेक्षा जास्त पशुचिकित्सक हे परवानाधारक आहेत, असे असतानाही सरकार खासगी महाविद्यालयांना परवानगी देऊन पशुवैद्यकीय शिक्षणाचे खासगीकरण तर करतच आहे पण सोबत भविष्यात बेरोजगारांची नवीन फौज उभी करत आहे. या सर्व बाबींचा विचार करून शासनाने यावर निर्णय घेत खासगी महाविद्यालयांना परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणीही विद्यार्थ्यांनी निवेदनात केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in