विदर्भात द्रूतगती मार्गाचे जाळे उभारणार; १२,५०० कोटींहून अधिक खर्च

विदर्भातील नियंत्रित प्रवेश महामार्गांचे जाळे विस्तारण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) प्रयत्नांना वेग दिला आहे.
विदर्भात द्रूतगती मार्गाचे जाळे उभारणार; १२,५०० कोटींहून अधिक खर्च
विदर्भात द्रूतगती मार्गाचे जाळे उभारणार; १२,५०० कोटींहून अधिक खर्च'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

स्वीटी भागवत/मुंबई

विदर्भातील नियंत्रित प्रवेश महामार्गांचे जाळे विस्तारण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) प्रयत्नांना वेग दिला आहे. प्रस्तावित भंडारा–गडचिरोली आणि नागपूर–गोंदिया द्रुतगती मार्गांच्या विविध टप्प्यांसाठी बांधकाम निविदा मागविण्यात आल्या आहेत. याशिवाय नागपूर–चंद्रपूर नियंत्रित प्रवेश द्रुतगती मार्गाच्या काही टप्प्यांसाठीही निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

हे प्रकल्प अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (ईपीसी) पद्धतीने स्वतंत्र टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार आहेत. या प्रस्तावित महामार्गांमुळे नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमधील रस्ते संपर्क अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे.

भंडारा–गडचिरोली नियंत्रित प्रवेश द्रुतगती मार्गासाठी एमएसआरडीसीने सुमारे ९४.२४ किलोमीटर लांबीच्या तीन बांधकाम टप्प्यांसाठी निविदा मागविल्या आहेत.

पहिल्या टप्प्यात नागपूर जिल्ह्यातील सावर्खेडा ते भंडारा जिल्ह्यातील कोकणगडदरम्यान २४.७०५ किलोमीटरचा मार्ग उभारण्यात येणार आहे. या कामाचा अंदाजित खर्च जीएसटी वगळता १,७३१.८४ कोटी रुपये आहे.

दुसऱ्या टप्प्यात भंडारा तालुक्यातील गराडा बु. ते लाखांदूर तालुक्यातील सरांडी बु. दरम्यान ३४.७५ किलोमीटरचा मार्ग प्रस्तावित आहे. या कामासाठी १,६६८.३१ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

तिसऱ्या टप्प्यात भंडारा जिल्ह्यातील सरांडी बु. ते चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील किन्हीपर्यंत ३४.७८६ किलोमीटरचा मार्ग उभारण्यात येणार आहे. या टप्प्यासाठी १,९५६.८४ कोटी रुपयांचा अंदाजित खर्च निश्चित करण्यात आला आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)