Chandrakant Patil: सोलापूरमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर फेकली शाही ; भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात

चंद्रकांत पाटील यांनी सोलापूरच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पहिल्यांदा सोलापूर दौरा केला होता
Chandrakant Patil: सोलापूरमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर फेकली शाही ; भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात
Published on

राज्याचे मंत्री आणि सोलोपूर जिल्ह्याचे नवनिर्वाची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पुन्हा एकदा शाही फेकल्याचा प्रकार घडला आहे. रविवार (१५ ऑक्टोबर) रोजी चंद्रकांत पाटील हे पालकमंत्री पद मिळाल्यानंतर पहिल्यांदा सोलापूच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी भीम आर्मीच्या कार्यकर्त्याने मंत्री पाटील यांच्यावर शाही फेकली. यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाल पांघरली. काही वेळानंतर शॉल बाजूला करक पाटील हे शासकीय विश्राम गृहात दाखल झाले.

चंद्रकांत पाटील यांनी सोलापूरच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पहिल्यांदा सोलापूर दौरा केला होता. ते रविवारी पहिल्यांदाच सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता. असं असताना देखील पाटील यांच्यावर भीम आर्मीच्या कार्यकर्त्याने शाही फेकत घोषणा देण्याचा प्रयत्न केला.

पाटील यांच्यावर शाही फेकण्यात आली त्यावेळी पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने व पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे त्यांत्यासह शहर व ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. एवढा चोख बंदोबस्त असताना देखील भीम आर्मीच्या अजय मैदार्गीकर नावाच्या कार्यकर्त्याने चंद्रकांत पाटील यांना काळे झेंडे दाखवत त्यांच्या अंगावर शाही फेकली. यावेळी विश्रामगृहावर मोठा गोंधळ निर्माण झाला होता. पोलिसांनी संबंधित आंदोलनकर्त्यांला ताब्यात घेतलं.

राज्य सकारकडून केली जाणार असलेल्या कंत्राटी भरतीला सर्व स्तरातून विरोध होताना दिसत आहे. याच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी मोर्चे आंदोलने होताना दिसत आहेत. निद्यार्थी तसंच अनेक नेते याविरोधात रस्त्यावर उतर आहेत. शासनाच्या या निर्णयाला विरोध म्हणून चंद्रकांत पाटील यांच्यावर शाही फेकण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in