Video : स्वाती मोहोळ यांनी घेतली गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट; म्हणाल्या, "मला..."

स्वाती मोहोळ या भाजप पुणे शहर महिला आघाडीच्या पदाधिकारी आहेत. त्यांनी 2022 साली भाजपात प्रवेश केला होता. त्यांच्या पक्षप्रवेशाची जोरदार चर्चा झाली होती.
Video : स्वाती मोहोळ यांनी घेतली गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट; म्हणाल्या, "मला..."

पुण्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आलेला कुख्यात गुंड शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. यावेळी स्वाती यांनी फडणवीस यांच्याकडे "मला न्याय मिळावा, हल्लेखोरांवर लवकरात लवकर कारवाई व्हावी", अशी मागणी केल्याची माहिती समोर आली आहे.

स्वाती मोहोळ या भाजप पुणे शहर महिला आघाडीच्या पदाधिकारी आहेत. त्यांनी 2022 साली भाजपात प्रवेश केला होता. त्यांच्या पक्षप्रवेशाची जोरदार चर्चा झाली होती. भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला होता. स्वाती यांना त्यांच्या वॉर्डमधून नगरसेवकासाठी तिकीट मिळणार असल्याची देखील चर्चा होती. तसेच, स्वाती मोहोळ यांच्या पाठोपाठ शरद मोहळ देखील राजकारण प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते.

अशी झाली कुख्यात गुंड शरद मोहोळची हत्या-

शरद मोहोळचा शुक्रवारी लग्नाचा वाढदिवस होता. तो मंदिरात चालला होता. त्यावेळी अज्ञातांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळ याच्यावर कोथरूड परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पण, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. गोळ्या झाडल्यानंतर आरोपी पसार झाले.

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी तीन पथके रवाना केले होती. त्यानंतर काही तासांत आठ जणांना ताब्यात घेतले होते. या प्रकरणात मुख्य आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर असल्याचे समोर आले आहे. साहिल हा शरद मोहोळ याचा साथीदार आहे. सात दिवसांपूर्वीच तो गँगमध्ये आला होता आणि त्यानेच संधी साधत गेम केल्याचे समोर आले आहे. जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in