माझी आई मला म्हटली, नवरा बदलायचा नाही; सरस्वती भुवनमध्ये रंगली 'शब्दांची मैफिल'

माझी आई मला म्हटली, नवरा बदलायचा नाही, एवढा बावळट माणूस तुला कुठेच मिळायचा नाही ही विनोदी कविता सादर करीत प्रसिद्ध विनोदी कवी विजय पोहनेरकर यांनी रसिकांना खळाळून हसवले. निमित्त होते सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयात आयोजित ‘शब्दांची मैफिल’ या कार्यक्रमाच्या उद्घाटनाचे.
माझी आई मला म्हटली, नवरा बदलायचा नाही; सरस्वती भुवनमध्ये रंगली 'शब्दांची मैफिल'
माझी आई मला म्हटली, नवरा बदलायचा नाही; सरस्वती भुवनमध्ये रंगली 'शब्दांची मैफिल'
Published on: 

छत्रपती संभाजीनगर : माझी आई मला म्हटली, नवरा बदलायचा नाही, एवढा बावळट माणूस तुला कुठेच मिळायचा नाही ही विनोदी कविता सादर करीत प्रसिद्ध विनोदी कवी विजय पोहनेरकर यांनी रसिकांना खळाळून हसवले. निमित्त होते सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयात आयोजित ‘शब्दांची मैफिल’ या कार्यक्रमाच्या उद्घाटनाचे.

धकाधकीच्या जीवनात रोजच्या अध्यापनाबरोबरच घडीभर एकत्र बसावे, परस्परातील ऋणानुबंधाचे दृढीकरण व्हावे, आपल्यातील साहित्यिक गुणांचा परिचय व्हावा आणि निखळ आनंद मिळावा म्हणून प्रा. कॅप्टन गजानन सानप यांच्या पुढाकाराने प्राध्यापक वेल्फेअर समितीअंतर्गत 'शब्दांच्या मैफिलीचे' आयोजन केले. सहभागी प्राध्यापकांनी स्व:रचितसह मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील मान्यवरांच्या रचनांनी रसिक चिंब भिजले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सतीश पाटील होते.

पोहनेरकर यांनी सुरवातीलाच ‘वड म्हणाला बाई मी तुला दोन हात जोडतो' ही विनोदी कविता मराठवाडी शैलीत सादर करून वातावरण हलके फुलके केले. प्रा विनय पाटील यांनी, संदीप खरे यांची ‘एक तरी ओळ अशी लिहावी’ ही कविता सादर करून काव्यनिर्मितीचे प्रयोजन सांगितले. प्रशांत अपसिंगेकर यांनी सादर केलेल्या 'प्रिये, तुझ्या आठवणीत चालताना मला चार टाके पडले' या विडंबन कवितेला मनसोक्त दादा मिळाली. स्वाती राठोड यांनी 'तू खुद के खोज मे' निकल व प्रणीता जोशी यांनी सादर केलेल्या विंदांच्या 'असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर' या कवितेला विशेष दाद मिळाली. मैफिलीचा शेवट उपप्राचार्य संजय गायकवाड यांनी सादर केलेल्या अटलजींच्या ‘भारत जमीन का टूकडा नही’ या देशभक्तीपर कवितेने झाला. मैफिलीत अमोल काटकर,छाया ठाकूर,अरुण कुलकर्णी,अविनाश तांदळे, योगेश राजेंद्र,या शिक्षकांनी कविता सादर केल्या. प्रेम,दुःख, मानवी जीवन, भाव- भावना, नातेसंबंध,प्रेरणा, स्वप्न,यासह विविध छटांना अधोरेखित केले. मैफिलीचे सूत्रसंचालन प्रा. विनय पाटील व प्रा डॉ. माया चव्हाण यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा डॉ सोनल नंदनुरवाले,प्रा लता जाधव, प्रा प्राजक्ता कुलकर्णी, संभाजी भंडे यांनी परिश्रम घेतले.

लोगों की नजर बुरेही रही

डॉ. विशाल देशपांडे यांनी ‘आयक्यूएसी कॉर्डिनेटर व सॉफ्टवेअर’ या कवितेत होणारी धावपळ विनोदी ढंगाने मांडली. प्रा. हरीश कुलकर्णी यांनी 'हम तो अच्छे थे पर लोगों की नजर में सदा बुरे ही रहे' ही गजल भाव खाऊन गेली. प्रा. पंजाबराव मोरे यांनी 'साधे सरळ असावे जीवनात माणसाने', तर अमोल कुलकर्णी यांनी 'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा' ही प्रसिद्ध कविता गाऊन वातावरण भारावून टाकले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in