बारामतीतून विजय शिवतारे १२ एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार

बारामतीतून विजय शिवतारे १२ एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांना बारामतीतून तिकीट दिले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाणार आहे. नणंद विरुद्ध भावजय असा संघर्ष सुरू असतानाच महायुतीतील शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनीही या लोकसभा निवडणुकीत उतरायची घोषणा केली.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे देशात लौकिक मिळवलेला मतदारसंघ म्हणजे बारामती. या बारामती मतदारसंघावर वर्चस्व मिळवण्यासाठी अनेक वर्षे भाजप प्रयत्न करत आहे. अनेक निवडणुका लढवूनही त्यांना यश आले नाही. आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांना महायुतीत घेऊन बारामतीवर ताबा मिळवण्याचे प्रयत्न भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांना बारामतीतून तिकीट दिले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाणार आहे. नणंद विरुद्ध भावजय असा संघर्ष सुरू असतानाच महायुतीतील शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनीही या लोकसभा निवडणुकीत उतरायची घोषणा केली. येत्या १२ एप्रिलला मी बारामतीतून निवडणूक अर्ज भरणार आहे, असे त्यांनी जाहीर केले. या निर्णयामुळे बारामती मतदारसंघात तिहेरी लढत होणार आहे.

शिवतारे म्हणाले की, मी १२ एप्रिल रोजी १२ वाजता बारामती लोकसभा मतदारसंघातून माझा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. माझ्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जोश आहे, आता माझ्याबाबत ते गोंधळ घालत आहेत. विजय शिवतारे उमेदवारी अर्ज भरणार नाहीत. त्यांच्यावर महायुतीमधील नेत्यांमधून दबाव येईल, ते ‘तडजोड’ करतील. तुमच्या माध्यमातून मी महायुतीतील नेत्यांना विनंती करतो की, ही लढाई मला लढू द्या. ही धर्माची लढाई आहे. राजकारणाची स्वच्छता करायची असल्यास मला हे करावे लागेल, अशी विनंती शिवतारे यांनी महायुतीतील नेत्यांना केली.

त्यांनी ग्रामीण भागात दहशत पसरवली असून अनेकांना दुखावले आहे. हा विंचू अनेकांना डसला आहे, आता तो विंचू मोदी साहेबांजवळ जाऊन बसला आहे. आता दोन्ही शक्तींचा बिमोड करायला पाहिजे. निवडून आल्यानंतर विजय शिवतारे महाराष्ट्रासाठी फकिर म्हणून काम करेल, असे ते म्हणाले.

मी १२ एप्रिल रोजी १२ वाजता बारामती लोकसभा मतदारसंघातून माझा उमेदवारी अर्ज दाखल करून प्रस्थापितांचे बारा वाजवणार आहे. मतदारसंघात मला प्रचंड प्रतिसाद मिळत असून माझा विजय होणारच, असा विश्वासही त्यांनी केला.

माझ्या व्यासपीठावर कोणताही मोठा नेता उपस्थित राहणार नाही. माझ्यासोबत फक्त जनसामान्य दिसतील. माझी ओळखपत्रे गावा-गावात वाटली जातील. १ एप्रिल रोजी सभा झाल्यानंतर पाच विधानसभा मतदारसंघांत सभा घेतल्या जातील. या सभांमध्ये त्या त्या भागातील प्रश्न मांडले जातील,असेही ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in