विजय वडेट्टीवारांची शिंदे समितीकडे 'ही' नवी मागणी ; म्हणाले, "शिंदे समितीने कुणबी नोंदी तपासताना..."

विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या मागणीमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाला आहे.
विजय वडेट्टीवारांची शिंदे समितीकडे 'ही' नवी मागणी ; म्हणाले, "शिंदे समितीने कुणबी नोंदी तपासताना..."

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आल्याने राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण झाला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास आपला विरोध दर्शवला आहे. दरम्यान आता राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला विरोध दर्शवला आहे. तसंच शिंदे समितीने ओबीसींच्या नोंदी तपासाव्या अशी मागणी केली आहे. वडेट्टीवार यांनी केलेल्या या मागणीमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाला आहे.

आरक्षणाची टक्केवारी वाढवून मराठा समाजाला आरक्षण द्या. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नका. सरसकट आरक्षणाला आमचा विरोध आहे. शेतकऱ्यांच्या सर्वाधीक आत्महत्या विदर्भात होतात. ते ओबीसी आहेत. ओबीसी समाजाला सर्वकाही मिळतं अशी अफवा पसरवण्यात आली आहे. तुम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार असाल तर आरक्षणाची टक्केवारी वाढवून द्या. वेगळा प्रवर्ग घ्या, ओबीसी आणि मराठा समाजाला दुखवू नका, असं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.

विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, शिंदे समितीने कुणबी नोंदी तपासल्या त्याच बरोबर ओबीसीतील सर्व वंचित जातीच्या नोंदी शोधाव्या आणि त्यासंदर्भात श्वेतपत्रिका जाहीर करावी. कुणबी नोंदी शोधत असताना ओबीसीतील अनेक जातींना लाभापासून वंचित राहावं लागतं कारण त्यांना वेळेवर नोंदी सापडत नाहीत. ६७ चे पुरावे न मिळाल्यामुळे ओबीसींना लाभापासून वंचित राहावं लागतात. आम्हाला देखील प्रमाणपत्रासाठी भटकावं लागलं.

logo
marathi.freepressjournal.in