धरले तर चावते, सोडले तर पळते! अजित पवारांवर विजय वडेट्टीवार यांची टीका

अजित पवार यांच्याबरोबर राजकीय युती, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका खासगी वाहिनीवर मुलाखतीत केले होते.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : अजित पवार यांच्याबरोबर राजकीय युती, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका खासगी वाहिनीवर मुलाखतीत केले होते. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेते गुलाबराव पाटील यांनी अर्थ खाते, नालायक खाते असा उल्लेख करत अजित पवारांवर टीका केली होती. त्यात अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यात ही अजित पवार यांनी पाठ फिरवली.‌ त्यामुळे अजित पवार यांची अवस्था धरले तर चावते, सोडले तर पळते अशी झाली, अशी जोरदार टीका विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र-राज्य सरकारला फटकारले आहे. विघ्नहर्ता महाराष्ट्रावरील महायुती नावाचे विघ्न दूर करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. वडेट्टीवार म्हणाले की, मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू असताना महायुती सरकारला, राज्याच्या कृषीमंत्र्यांना शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याची चूल पेटली नाही तरीदेखील राज्याचे कृषीमंत्री सिने तारकांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात व्यस्त आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी मदत मागायची कुणाकडे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्याचा दौरा करून तात्काळ ३,४४८ कोटींची या राज्यांना मदतीची घोषणा केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in