"हे तिघ डाकू आणि....", विजय वडेट्टीवार यांचे शिंदे, फडणवीस, पवार यांच्यावर गंभीर आरोप

त्यांच्याकडे जनतेच्या विकासाचा प्लॅन नाही. याउलट आमदारांच्या विकासाचा प्लॅन या लोकांकडे आहे", असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
"हे तिघ डाकू आणि....", विजय वडेट्टीवार यांचे शिंदे, फडणवीस, पवार यांच्यावर गंभीर आरोप

राज्याच्या विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचावर टीकेची झोड उठवली आहे. ते म्हणाले की, "प्रत्येक गटांची जवाबदारी त्यांच्या मुख्यांकडे असते. राष्ट्रवादीच्या आमदारांची जबाबदारी अजित दादा यांच्यावर आहे. फडणवीसांच्या आमदारांची जबाबदारी फडणवीसांवर आणि त्यांच्याबरोबर शिंदेंच्या आमदारांची शिंदेंवर असल्याने विकासाच्या नावाने ते लोक तिजोरी ओरबडत आहेत. हे तिघे डाकू आणि लुटेरे आहेत, ज्यांना फक्त तिजोरी साफ करायची आहे. त्यांच्याकडे जनतेच्या विकासाचा प्लॅन नाही. याउलट आमदारांच्या विकासाचा प्लॅन या लोकांकडे आहे", असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

अजित पवारांच्या कंत्राटी भरतीच्यामुद्द्यावर वडेट्टीवार म्हटलं की, "35 संवर्गासाठी हा जीआर काढला ही केवळ बनवाबनवी आहे. अजित दादांनीअशी फसवणूक करू नये, हा जीआर पुन्हा नव्याने काढताना विरोध दर्शविला गेला होता. आता काय पुळका आला की कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला. कॉर्पोरेशनमध्ये पद भरण्याचा समावेश आहे. त्यामुळे दिशाभूल करणारे वक्तव्य करू नये", असंही ते म्हणाले.

त्यानंतर राष्ट्रवादीतील फुटीवर वडेट्टीवार म्हणाले की, "या पक्षात दोन गट पडले आहेत हे स्पष्ट झाले आहे, अस्तित्वाची लढाई असल्यामुळे शरद पवार साहेबांसमोरून अजित पवार कधी जात नाही, तर मागून जातात. त्यांच्या चेहऱ्यावर गिल्टीपणा आणि त्यांच्या वागण्यातून राग दिसून येतो", असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in