विनायक पाटील राज्यात पहिला, पूजा वंजारीची मुलींमध्ये बाजी; राज्यसेवा परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर

राज्य लोकसेवा आयोगामार्फत 2022 साली 600 पदांसाठी ही परिक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेतून अंतिम 1800 उमेदवार हे मुलाखतीसाठी निवडण्यात आले होते.
विनायक पाटील राज्यात पहिला, पूजा वंजारीची मुलींमध्ये बाजी; राज्यसेवा परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षा 2022ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. यात विनायक नंदकुमार पाटील या तरुणाने बाजी मारली आहे. विनायक हा राज्यात पहिला आला असून धनंजय वसंत बांगर हा दुसरा आला आहे. तर, मुलींमध्ये पूजा वंजारी प्रथम आली असून प्राजक्ता पाटील ही दुसरी आली आहे.

राज्य लोकसेवा आयोगामार्फत 2022 साली 600 पदांसाठी ही परिक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेतून अंतिम 1800 उमेदवार हे मुलाखतीसाठी निवडण्यात आले होते. या उमेदवारांच्या मुलाखतीचा शेवटचा टप्पा हा गुरूवारी पार पडला आणि त्याच दिवशी संध्याकाळी सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झाली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in