महाविकास आघाडीचे विनायक राऊत यांचा अर्ज दाखल

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी विनायक राऊत यांनी येथील मराठा हॉलमध्ये महाविकास आघाडीची सभा घेतली. या सभेला महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
महाविकास आघाडीचे विनायक राऊत यांचा अर्ज दाखल

रत्नागिरी : महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाकडून मंगळवारी आपला रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी विनायक राऊत यांनी येथील मराठा हॉलमध्ये महाविकास आघाडीची सभा घेतली. या सभेला महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

राऊत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, मी उमेदवारी अर्ज भरला याचा मला आनंद झाला आहे. माझा विजय निश्चित आहे. महायुतीचा जो कोणी उमेदवार रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उभा राहील, त्याचा अडीच लाखांनी निश्चित पराभव होणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

logo
marathi.freepressjournal.in