लोकसभेआधी 'इनकमिंग'साठी भाजपची खास रणनीती; विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी

समितीचे संयोजकपद महाराष्ट्रातील विनोद तावडे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. दुसऱ्या पक्षातून येणाऱ्या राजकीय नेत्यांबाबत ही समिती निर्णय घेणार आहे.
लोकसभेआधी 'इनकमिंग'साठी भाजपची खास रणनीती;  विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून खास रणनीती तयार करण्यात आली आहे. निवडणुकीच्या तोंडावर पक्षात बाहेरील राजकीय नेत्यांचे इनकमिंग सुरु होते, त्यासाठी भाजप पक्षश्रेष्ठींनी मोठा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये येणाऱ्या नेत्यांबाबत निर्णय घेण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे संयोजकपद महाराष्ट्रातील विनोद तावडे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. दुसऱ्या पक्षातून येणाऱ्या राजकीय नेत्यांबाबत ही समिती निर्णय घेणार आहे.

इतर पक्षातून भाजपमध्ये येणाऱ्या नेत्यांबाबत संयोजक समितीच पक्षप्रवेशाचा अंतिम निर्णय घेणार आहे. समितीच्या परवानगी नंतरच बाहेरच्या पक्षाचे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपकडून आठ जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. आठ जणांमध्ये भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, अश्विनी वैष्णव, मनसुख मांडवीया हे चार केंद्रीय मंत्री, विनोद तावडे, तरुण चूग आणि सुनील बंसल हे तीन राष्ट्रीय महासचिव आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांचा समावेश आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी याची बुधवारी घोषणा केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in