संजय राऊत यांच्यावर हक्कभंग दाखल करावा ; संजय शिरसाट यांची विधानसभाध्यक्षांकडे मागणी

संजय शिरसाट यांनी मागणी अर्जात म्हटले आहे की, भारतीय संविधानाने विधानसभा अध्यक्ष यांना व्यापक, नियमनात्मक, प्रशासकीय आणि न्यायिक अधिकार दिले आहेत
संजय राऊत यांच्यावर हक्कभंग दाखल करावा ; संजय शिरसाट यांची विधानसभाध्यक्षांकडे मागणी

शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. तशी मागणी करणारे पत्रच त्यांनी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पाठविले आहे. विधानसभा अध्यक्षांवरच संजय राऊत यांनी आरोप केले आहेत. त्या विरोधात राऊत यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी शिरसाट यांची मागणी आहे. आता विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यावर काय निर्णय घेणार, हे पहावे लागणार आहे.

संजय शिरसाट यांनी मागणी अर्जात म्हटले आहे की, भारतीय संविधानाने विधानसभा अध्यक्ष यांना व्यापक, नियमनात्मक, प्रशासकीय आणि न्यायिक अधिकार दिले आहेत. विधानसभा अध्यक्ष हे विधानमंडळ आणि विधानसभा सचिवालयाचे प्रमुख, पीठासीन अधिकारी असतात. विधानसभा अध्यक्षांना घटना, कार्यपद्धती, नियम आणि संसदीय परंपरांच्या अंतर्गत अधिकार आहेत. कायदे मंडळाचे अध्यक्ष या नात्याने विधानसभा अध्यक्ष हे न्यायाधीशांच्या भूमिकेत असतात. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात देखील आव्हान देता येत नाही, इतके अधिकार विधानसभा अध्यक्षांना दिलेले असतात. अशा परिस्थितीत विधानसभेच्या अध्यक्ष पदावर नियुक्त व्यक्तीवर खासदार संजय राऊत यांच्याकडून होत असलेले आरोप गंभीर आहेत.

logo
marathi.freepressjournal.in