पुण्यात यंदाचे विश्व मराठी संमेलन; ३१ जानेवारीपासून प्रारंभ, मंत्री उदय सामंत यांची माहिती

राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे आयोजित तिसरे विश्व मराठी संमेलन पुण्यात ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान होणार आहे.
उदय सामंत
उदय सामंतसंग्रहित छायाचित्र
Published on

पुणे : राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे आयोजित तिसरे विश्व मराठी संमेलन पुण्यात ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. संमेलन फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर होईल, अशी माहिती राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली

या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत.

एका ज्येष्ठ साहित्यिकाचा आणि मराठी भाषेत कामाला सुरुवात करून आज लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या एका तरुणाचा सन्मान करण्याचा उपक्रम या संमेलनापासून सुरू करत आहोत. याअंतर्गत यंदा ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक आणि अभिनेते रितेश देशमुख यांचा या संमेलनात गौरव केला जाणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in