जंजिरा किल्ल्याला भेट देताय? तुमच्याकडे आहेत फक्त दोन दिवस! २६ मेपासून ३१ ऑगस्टपर्यंत किल्ला बंद

महाराष्ट्रातील प्रसिद्ध जलदुर्ग जंजिरा हा पर्यटकांसाठी पावसाळ्यामुळे २६ मे ते ३१ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबत पुरातत्त्व संशोधन विभागाचे अधिकारी बजरंग येलीकर यांनी माहिती दिली.
जंजिरा किल्ल्याला भेट देताय? तुमच्याकडे आहेत फक्त दोन दिवस! २६ मेपासून ३१ ऑगस्टपर्यंत किल्ला बंद
Published on

रायगड : महाराष्ट्रातील प्रसिद्ध जलदुर्ग जंजिरा हा पर्यटकांसाठी पावसाळ्यामुळे २६ मे ते ३१ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबत पुरातत्त्व संशोधन विभागाचे अधिकारी बजरंग येलीकर यांनी माहिती दिली.

मुरूड तालुक्यात ऐतिहासिक जंजिरा हा सागरी किल्ला आहे. दरवर्षी समुद्रातील सुरक्षिततेच्या कारणामुळे या किल्ल्यात पर्यटकांना बंदी करण्यात येते. पावसाळी वातावरणात समुद्र खवळलेला असतो. बऱ्याचदा मोठ्या लाटा उसळत असल्याने पर्यटकांना धोका निर्माण होऊ शकतो, यासाठी शासकीय स्तरावरून निर्णय घेतला जातो.

यंदा २६ मेपासून पर्यटकांसाठी किल्ल्याचे दरवाजे बंद करावेत, असे आदेश मेरिटाइम बोर्ड आणि पुरातत्त्व संशोधन खात्याला प्राप्त झाले आहेत. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती येलीकर यांनी दिली. दरम्यान, जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येत असतात. ऐतिहासिकदृष्ट्या हा किल्ला अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आता ३१ ऑगस्टपर्यंत हा किल्ला बंद राहणार आहे. त्यामुळे जंजिरा येथे पर्यटनाचा प्लॅन करणाऱ्यांना ३१ ऑगस्टची वाट पाहावी लागेल.

logo
marathi.freepressjournal.in