पुणे-सातारा महामार्गावर मतदार अडकले; १५ किमीपर्यंत वाहनांच्या रांगांमुळे वाहतूककोंडी

सातारा जिल्ह्यात बुधवारी राज्य विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले आहे. मतदानानिमित्त मतदारसंघाबाहेर पुणे-मुंबई व अन्य ठिकाणी राहणारे मतदार आपल्या गावी मतदानासाठी आले होते तर काही येत होते. तसेच गेल्या एक दोन दिवसांपूर्वी आलेले मतदार मतदान करून परत जात होते.
पुणे-सातारा महामार्गावर मतदार अडकले; १५ किमीपर्यंत वाहनांच्या रांगांमुळे वाहतूककोंडी
Published on

कराड : सातारा जिल्ह्यात बुधवारी राज्य विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले आहे. मतदानानिमित्त मतदारसंघाबाहेर पुणे-मुंबई व अन्य ठिकाणी राहणारे मतदार आपल्या गावी मतदानासाठी आले होते तर काही येत होते. तसेच गेल्या एक दोन दिवसांपूर्वी आलेले मतदार मतदान करून परत जात होते. अशात येथील पुणे- बंगळुरु राष्ट्रीय महामार्गाच्या सहा पदरीकरणाच्या रुंदीकरणाचे काम रखडल्याने ठिकठिकाणी वाहतूककोंडी होत असून त्यातच पुणे-मुंबईकडून गावाकडे मतदान करण्यासाठी जाणारे नागरिक मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडीत अडकले होते. परिणामी आपले मतदान होते की नाही या काळजीत ते मतदार पडले होते तर प्रशासनाला याबाबत काही घेणं देणं नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

पुणे-सातारा महामार्गावरील नवले ब्रिज येथील सुवर्णमंदिर पासून ते वरवेपर्यंत जवळपास १५ किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. यामुळे सातारा बाजूकडे जाणाऱ्या मार्गावर चक्काजाम झाला होता. खेड शिवापुर तसेच शिवरे (ता. भोर) येथील होणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामाच्या ठिकाणी रस्त्याच्या कामाचा बोजवारा उडाल्याने पुणे, मुंबईकडून सातारा, सांगली, कोल्हापूर, महाबळेश्वरकडे जाणारी वाहने उलटसुलट जात असल्याने वाहतूककोंडीत आणखी भर पडली आहे.

पुणे-सातारा महामार्गावर सातारा बाजूकडे जाणाऱ्या वाहने मोठी प्रमाणावर असल्या कारणाने नवले ब्रिज सुवर्ण मंदिर, दरीपुल, गोगलवाडी फाटा, कोंढणपूर फाटा, खेड शिवापुर टोलनाका, शिवरे, वरवे येथील मार्गावर वाहने अडकले होते. गावाकडे जाणारे मतदारांना आपले मतदान होईल की नाही ? या चिंतेत असल्याचे दिसून आले. शिवरे येथील उड्डाणपुलाचे काम करणारे निखिल कन्स्ट्रक्शन कडून कामात सुधारणा होत नसल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे. वाहतूककोंडीत अनेक रुग्णवाहिका देखील अडकल्या होत्या. त्यानंतर अनेकांनी पोलीस व अन्य प्रशासकीय यंत्रणांना फोनवरून कळवल्यानंतर पोलिसांनी लक्ष घालत तब्बल दोन तासांनंतर वाहतूककोंडी सुरळीत करण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in