पुणे-बिकानेर-पुणे एक्स्प्रेसचा मिरजेपर्यंत विस्तार; प. महाराष्ट्रातील प्रवाशांना आता मिरजेतून थेट बिकानेरला जाता येणार

पुणे - बिकानेर - पुणे साप्ताहिक एक्स्प्रेसचा विस्तार मिरजपर्यंत करण्यात आला असल्यामुळे मिरजेतून थेट बिकानेर जाण्यासाठी नवीन एक्स्प्रेस उपलब्ध झाली आहे.
पुणे-बिकानेर-पुणे एक्स्प्रेसचा मिरजेपर्यंत विस्तार; प. महाराष्ट्रातील प्रवाशांना आता मिरजेतून थेट बिकानेरला जाता येणार
Published on

कराड : पुणे - बिकानेर - पुणे साप्ताहिक एक्स्प्रेसचा विस्तार मिरजपर्यंत करण्यात आला असल्यामुळे मिरजेतून थेट बिकानेर जाण्यासाठी नवीन एक्स्प्रेस उपलब्ध झाली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडील गावांसह सातारा, सांगली व कोल्हापूर या प. महाराष्ट्रातील जिल्ह्यांतील प्रवाशांची मोठी सोय झाली आहे.

मध्य रेल्वेने पुणे-बिकानेर-पुणे ही साप्ताहिक एक्स्प्रेस मिरजेपर्यंत सुरू होण्यापूर्वीपर्यंत ही गाडी मिरजेतून पुण्यापर्यंत व पुण्यापासून बिकानेरपर्यंत वेगवेगळ्या गाडी क्रमांकाने घावत असल्याने मिरजेतून पुण्यापर्यंत व नंतर पुण्यातून बिकानेरपर्यंत वेगवेगळे तिकीट घेऊन प्रवास करावा लागत होता. मात्र सदर गाडी एकाच क्रमांकाने थेट मिरज ते बिकानेर सोडण्याची मागणी पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे कराडचे सदस्य गोपाल तिवारी यांनी रेल्वेच्या सल्लागार समितीच्या बैठकीत केली होती व याबाबत वारंवार पाठपुरावाही केला होता. अखेर रेल्वेने तिवारी यांच्या मागणीची दाखल घेत आता २०४७५/२०४७६ या क्रमांकाची गाडी मिरज ते बिकानेर एक्स्प्रेस या नावाने चालवली जाणार आहे.

आता या गाडीला वेगवेगळ्या तिकिटाची गरज नाही.

अशी धावणार एक्स्प्रेस

सदर गाडी बिकानेरवरून प्रत्येक सोमवारी सकाळी साडेसात वाजता निघेल व दुसऱ्या दिवशी मंगळवारी दुपारी १.४५ मिरजेला पोहोचेल. मिरजेतून ही गाडी दर मंगळवारी दुपारी २.२५ ला निघेल आणि बिकानेरला बुधवारी रात्री ८.४० वाजता पोहोचेल. या गाडीला कराड सातारा व लोणंद थांबा देण्यात आलेला आहे दर मंगळवारी बिकानेर-मिरज गाडी लोणंद सकाळी ९.३० वा.,सातारा १०.४२ वा. आणि कराड ११.५० वा. या वेळेवर पोहोचणार आहे. त्यानंतर दुपारी हीच गाडी मिरज- बिकानेर अशी मिरजेतून २.२५ वा. सुटणार आहे, कराडला १५.२५ वा. सातारा १६.४० वा.लोणंद १७.४० वा. येऊन पुढे पुणे, बिकानेरकडे मार्गस्थ होईल, असे निवेदन पुणे रेल्वे सल्लागार समिती सदस्य गोपाल तिवारी यांनी प्रसिद्धीसाठी दिले आहे.

logo
marathi.freepressjournal.in