जुन्या आजारावर वेटिंग पिरीयड ३६ महिन्यांवर : आरोग्य विमा ग्राहकांना मोठा दिलासा; आयआरडीएचा निर्णय

‘आयआरडीए’ने नुकतीच याबाबतची जाहीर अधिसूचना काढली आहे. यानुसार, विमा ग्राहकाला असलेल्या जुन्या आजारांचा वेटिंग पिरीयड आता पॉलिसी सुरू झाल्याच्या तारखेपासून ३६ महिन्यांची असेल. ३६ महिने पूर्ण झाल्यानंतर हे जुने आजार व उपचारांना विमा संरक्षण मिळू शकेल. मात्र, ही विमा पॉलिसी सातत्याने सुरू राहायला हवी.
जुन्या आजारावर वेटिंग पिरीयड ३६ महिन्यांवर : आरोग्य विमा ग्राहकांना मोठा दिलासा; आयआरडीएचा निर्णय

मुंबई : सध्या आरोग्य विमा असल्याशिवाय रुग्णालयाची पायरी चढणे कठीण बनले आहे. पण, हा आरोग्य विमा देताना विमा कंपन्या अनेक अटी व शर्ती लागू करतात. त्यातील महत्त्वाची अट म्हणजे रुग्णाला जुना आजार असल्यास त्याला उपचारासाठी ४ वर्षे थांबावे लागते. हा वेटिंग पिरीयड ४ ऐवजी ३ वर्षांचा करण्याचा निर्णय आयआरडीएने घेतला आहे. यामुळे कोट्यवधी विमा ग्राहकांना मोठा लाभ मिळणार आहे. नवीन नियम एक एप्रिल २०२४ पासून लागू होणार आहे.

‘आयआरडीए’ने नुकतीच याबाबतची जाहीर अधिसूचना काढली आहे. यानुसार, विमा ग्राहकाला असलेल्या जुन्या आजारांचा वेटिंग पिरीयड आता पॉलिसी सुरू झाल्याच्या तारखेपासून ३६ महिन्यांची असेल. ३६ महिने पूर्ण झाल्यानंतर हे जुने आजार व उपचारांना विमा संरक्षण मिळू शकेल. मात्र, ही विमा पॉलिसी सातत्याने सुरू राहायला हवी.

विमा ग्राहकाने पॉलिसी खरेदी घेताना जुन्या आजारांची सर्व माहिती विमा कंपनीला दिली पाहिजे. त्यामुळे संबंधित विमा कंपनी त्यांच्या विमा उत्पादनातील संबंधित आजारांचा वेटिंग पिरीयड कमी करण्याचा प्रयत्न करू शकते. हा नियम परदेशी यात्रा पॉलिसींना लागू होणार नाही.

आयआरडीएने सांगितले की, विमा कंपन्यांनी सोपी व सहज उत्पादने सादर करण्याची गरज आहे. जे विमाधारकांना सहजपणे समजू शकेल. पॉलिसीतील कराराचे शब्द, कव्हरेज, अटी व शर्तीत पारदर्शकता व स्पष्टता असली पाहिजे. पॉलिसीधारकांच्या हितांचे संरक्षण झाले पाहिजे. उत्पादनाशी संबंधित सर्व जोखमांचे मूल्यनिर्धारण योग्य प्रकारे झाले पाहिजे. तसेच प्रीमियमचे दरही वाजवी असायला हवेत. तसेच विमाधारकांना त्यांनी भरलेल्या प्रीमियमचे योग्य मूल्य द्यावे. तसेच जे उत्पादन योग्य नसल्यास ते परतही घेतले जावे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in