राज्यात पुढील ४८ तासात मुसळधार पावसाचा इशारा ; हवामान खात्याने दिला 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

राज्यात पुढील ४८ तासात मुसळधार पावसाचा इशारा ; हवामान खात्याने दिला 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

कोकण किनारपट्टीवर खोल समुद्रात चक्रीवादळ निर्माण होत असल्याने लोकांना सावधान केलं जातं आहे.

राज्यात परतीच्या पावसामुळे अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. राज्यातील अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे. अनेक ठिकाणी नद्या नाल्यांना पुर आले आहेत. आता हवामान खात्याने येणाऱ्या ४८ तासांत मुसळदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पुढील ४८ तासात मुसळधार पाऊस कोसळेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

मुंबईतील अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. आज आणि उद्या समुद्रची पातळी वाढणार असल्याने महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टी भागातील मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

याच बरोबर कोल्हापूर आणि कोकणाला हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे. कोकण किनारपट्टीवर खोल समुद्रात चक्रीवादळ निर्माण होत असल्याने लोकांना सावधान केलं जातं आहे. या चक्रीवादळाचा त्याचा प्रभाव कोकण आणि गोवा किनारपट्टीवर दिसत आहे. हवामान खात्याने २९ सप्टेंबरपासून पूर्व भारतात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला होता.

नैऋत्य मान्सून सामान्यपणे 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होतो, त्यानंतर 8 जुलैपर्यंत संपूर्ण देश व्यापतो. साधारणपणे 17 सप्टेंबरपासून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होते. त्यानंतर 15 ऑक्टोबरपर्यंत हा परतीचा प्रवास सुरु असतो.

logo
marathi.freepressjournal.in