कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून पाणी विसर्ग

नदीपात्रात एकूण २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याची माहिती कोयना सिंचन विभागाच्या वतीने देण्यात आली.
कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून पाणी विसर्ग
Published on

कराड : सांगली सिंचन विभागाकडून सिंचनाची मागणी केल्यासह पूर्वेकडील पाटण,कराड तालुक्यांसह सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील कृष्णा नदीकाठांवरील गावांतील पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी कोयना धरणाच्या पायथा विद्युत गृहाची दोन्ही जणींत्रे शुक्र.२७ रोजी सायंकाळी सुरू करण्यात आली असून यामधून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रामध्ये सुरू करण्यात आला असल्याची माहितीकोयना सिंचन विभागाने दिली आहे. कोयना पाणलोट क्षेत्रासह सर्वत्रच गेल्या आठवड्यापासून परतीच्या पावसानेही पूर्णपणे उघडीप दिली असून कोयना धरणातील पाणीसाठा ८८.८६ टीएमसी म्हणजेच ८४.४३ % इतका शिल्लक राहिला आहे.मात्र सांगली सिंचन विभागाकडून सिंचनाची मागणी आली असून याचवेळी पूर्वेकडील पाटण,कराड तालुक्यांसह सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा नदीकाठांवरील गावांतील लोकांच्या पिण्याचे पाण्यासाठी कोयना धरण पायथा विद्युत गृहाचे एक युनिट शुक्रवारी दुपारी कार्यान्वित करून त्यामधून प्रतिसेकंद १०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला, तर सायंकाळी पुन्हा दुसरे युनिट सुरू करून कोयना नदीपात्रात एकूण २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याची माहिती कोयना सिंचन विभागाच्या वतीने देण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in