उत्तर महाराष्ट्राच्या धरणातून जायकवाडीत पाणी सोडलं जाणार; सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय कायम

या प्रकरणी अहमदनगरच्या प्रवरा, संजीवनी, शंकरराव काळे कारखान्यांमधून याचिका दाखल करण्यात आली होती.
उत्तर महाराष्ट्राच्या धरणातून जायकवाडीत पाणी सोडलं जाणार; सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय कायम

मराठवाडा पाणीप्रश्नी आज सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाच निर्णय आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील धरणातून जायकवाडीमध्ये पाणी सोडण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवलं आहे. त्यानुसार आता उत्तर महाराष्ट्राच्या धरणातून जायकवाडी धरणामध्ये ८.५ टीएमसी पाणी सोडलं जाणार आहे.

या प्रकरणी अहमदनगरच्या प्रवरा, संजीवनी, शंकरराव काळे कारखान्यांमधून याचिका दाखल करण्यात आली होती. या तिन्ही कारखान्यांचा जायकवाडीला पाणी देण्याला विरोध होता. नगर जिल्ह्यातील कारखानदारांनी मराठवाड्याला पाणी सोडण्यास विरोध होता. त्यावर आजच्या सुनावणीत पाणी सोडण्याच्या निर्णय झाला आहे. राज्य सरकारकडून पाणी सोडण्यास कोर्टाने अनुमती दिली आहे.

२००५ च्या समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार जायकवाडी धरणाचा विचार करता नाशिकमधील धरणांमधून पाणी सोडण्याचा कायदा संमत करण्यात आला होता. मात्र आता या कायद्याला विरोध होत असून कायद्याबाबत फेरविचार व्हावा म्हणून अहमदनगर आणि नाशिकमधून मागणी होत आहे.

केंद्र सरकारचा दमणगंगा, नारपार नद्यांच्या खोऱ्यांमधून गुजरातला पाणी घेऊन जाण्याचा विचार आहे. या नारपार योजनेला देखील नाशिकच्या स्थानिकांचा विरोध आहे. यंदा अपेक्षित पाऊस पाऊस पडलेला नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उन्हाळ्याच्या दिवसात निर्माण होऊ शकतो. तसंच भविष्यात याचा परिणाम शेतीवर देखील होऊ शकतो, अशी भीती स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in