
नाशिक : पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घेतलेल्या कठोर आणि प्रभावी उपाययोजनांचे आता सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे नाशिक जिल्हा "कायद्याचा बालेकिल्ला" बनत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
दीपावलीच्या दुसऱ्या दिवशी गवळी समाज आणि दुग्ध व्यवसायिकांच्या वतीने पारंपरिक रेड्यांची मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली. यावर्षी या मिरवणुकीत एक वेगळे आकर्षण पाहायला मिळाले. रेड्याच्या पाठीवर We Support Nashik Police आणि “नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला” असे संदेश लिहिलेले होते.
या अभिनव उपक्रमातून समाजाने नाशिक पोलिसांप्रती आपला विश्वास आणि पाठिंबा व्यक्त केला आहे. नागरिक, व्यापारी व सामाजिक संस्थांकडूनही पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या कार्याचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.