आम्ही शिवसेनेच्या कार्यालयात मुख्यमंत्र्यांची हार, पुष्पगुच्छ घेऊन वाट बघत होतो, मात्र...
राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी पालिका मुख्यालयात आले होते. त्यावेळी ते महापालिकेमधील शिवसेना कार्यालयात येतील असे वाटले होते, मात्र ते आलेच नाहीत. आम्ही शिवसैनिक आहोत, असे मुख्यमंत्री सतत बोलत आहेत. आम्ही शिवसेनेच्या कार्यालयात त्यांची हार, पुष्पगुच्छ घेऊन वाट बघत होतो. मात्र ते भाजपच्या कार्यालयात गेले, असे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.
दरवर्षी पावसाळ्यात मुंबईत पाणी जमा होते, मात्र यंदाच्या पावसाळ्यात मुंबईत काही ठिकाणी पाणी साचले, परंतु तेवढ्याच जलदगतीने निचरा झाला हे शिवसेनेचे यश आहे, असे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षास त्यांनी भेट दिली, त्यानंतर त्या बोलत होत्या.
मुंबईत सलग दोन दिवस मुसळधार पाऊस पडला आहे. यामुळे सखल भागात पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला भेट देऊन आढावा घेतला.