आमच्या वाट्याचे आरक्षण देणार नाही ;प्रकाश शेंडगे यांचा आझाद मैदानात इशारा

ओबीसी समाज आज अनेक समस्या सामोरे जात असताना सरकार समाजा-समाजामध्ये वाद निर्माण करत आहे.
आमच्या वाट्याचे आरक्षण देणार नाही ;प्रकाश शेंडगे यांचा आझाद मैदानात इशारा
PM

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी २० जानेवारीला मुंबईतील आझाद मैदान येथून सरकारला इशारा दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी २० जानेवारीला आझाद मैदान येथून इशारा दिला आहे. २० जानेवारी पासून महाराष्ट्रभर ओबीसी आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे.

मराठा समाज श्रीमंत आहे. त्यांचे आंदोलनही मोठे असणार. मात्र आमचा समाज गरीब आहे. मराठा समाज मोठी महागडी वाहने घेऊन येऊ शकतात, आम्ही मात्र गाढव, घोडे घेऊन येऊ शकतो. कारण आमचा समाज भटका समाज आहे. मराठा समाजापेक्षा ओबीसी समाज संख्येने मोठा आहे. त्यामुळे सरकारने काही दगाफटका केला, तर ओबीसी समाजाशी गाठ आहे. निवडणुका जवळ येत आहेत. त्यावेळी हा समाज योग्य तो निर्णय घेईल, असा इशारा शेंडगे यांनी यावेळी दिला.

धनगड व धनगर या सरकारी हिंदी भाषेमुळे आज प्रत्येक राज्यात ओबीसी आरक्षणबाबत परिस्थिती वेगवेगळी आहे. न्यायालयात टिकेल असे आरक्षण जर मराठा समाजाला दिले असते, तर आज जारंगे पाटील यांना आंदोलन करण्याची वेळ आली नसती, असे सांगत प्रकाश शेंडगे म्हणाले की, धनगर समाज काय किंव्हा इतर कोणताही समाज काय, सर्व समाजाची जनगणना झाली पाहिजे. तरच वास्तव समोर येईल.

सरकार समाजा-समाजामध्ये वाद निर्माण करीत आहे

ओबीसी समाज आज अनेक समस्या सामोरे जात असताना सरकार समाजा-समाजामध्ये वाद निर्माण करत आहे. मंत्री छगन भुजबळ व जरांगे पाटील हा वाद सरकारच लावत आहे असे चित्र आज निर्माण केले आहे. मात्र खरे पाहता भुजबळ हे न्यायालयाचे निर्णय व आरक्षणाबाबत सरकार काय बाजू मांडेल व मांडवी याबाबत योग्य तेच बोलत आहेत, असे प्रकाश शेंडगे यांनी यावेळी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in