आम्ही आमची रणनीती उघड करणार नाही - जरांगे, पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांबाबत चर्चा संपन्न

देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाचा द्वेष करतात, त्यामुळे सगे सोयरेचा निर्णय होत नाही. देवेंद्र फडणवीस आमचे शत्रू नाही, पण मराठा द्वेषामुळे आणि त्यांच्या वागण्याची विचित्र पद्धतीमुळे आम्ही त्यांच्यावर नाराज आहोत, असा आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी केला.
आम्ही आमची रणनीती उघड करणार नाही - जरांगे, पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांबाबत चर्चा संपन्न
Published on

पुणे : देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाचा द्वेष करतात, त्यामुळे सगे सोयरेचा निर्णय होत नाही. देवेंद्र फडणवीस आमचे शत्रू नाही, पण मराठा द्वेषामुळे आणि त्यांच्या वागण्याची विचित्र पद्धतीमुळे आम्ही त्यांच्यावर नाराज आहोत, असा आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी केला. दरम्यान, राज्यातील सर्व मराठा बांधवाची लवकरच अंतरवली सराटी पुन्हा एकदा बैठक घेऊ आणि मग ठरवू की निवडणूक लढवायची की २८८ पाडायचे. आम्ही आमची रणनीती उघड करणार नाही, अन्यथा देवेंद्र फडणवीस डाव करतील, असेही ते म्हणाले.

मनोज जरांगे-पाटील पुणे जिल्हा दौऱ्यावर आहेत. मंगळवारी मध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, निवडणूक लढविण्याबाबत पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांबाबत चर्चा झाली आहे. पण कोणताही निर्णय झाला नाही. राज्यातील सर्व मराठा बांधवाची लवकरच अंतरवली सराटी येथे बैठक घेतली जाणार आहे. त्या बैठकीकरीता राज्यभरामधून जवळपास २० ते २२ लाख समाज बांधव येण्याची शक्यता आहे. त्यामध्ये लढायच की पाडायचं, हे ठरवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे लोक मला येऊन गुपचूप भेटतात. ती लोक देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात तक्रार करतात. निवडणूक लढवण्याची वेळ आली तर मी सगळे उघड करेन. दहशतीने निवडणूक जिंकता येत नाही तर मायेने जिंकता येणार आहे, हे देवेंद्र फडणवीस यांनी समजून घ्यावे. देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय सरकारमधील पानही हलत नाही.‌ फडणवीस हे ओबीसी नेत्यांना हाताशी धरतात. ओबीसी समाजातल्या नेत्यांना फूस लावतात. त्यांना नादी लावतात असे त्यांच्याच राज्यभरात तुम्ही दौरे करीत आहात, उपोषण केले पाहिजे की विधानसभा निवडणूक लढवली पाहिजे. नेमकी कार्यकर्त्यांची भावना काय आहे? या प्रश्नाला उत्तर देताना जरांगे-पाटील म्हणाले, समाजाची कोणत्या बाबतीत तयारी आहे, मी त्यांचा मुलगा आहे, त्यामुळे उपोषणाला विरोध केला जातो. ते विरोध करतात पण मी काहीही चुकीच करीत नाही. समाजातील मुलांच्या कल्याणासाठी लढा देत आहे.

आता राज्य सरकारला वेळ दिला जाणार आहे का त्या प्रश्नावर ते म्हणाले की, वर्षभर वेळ दिला आहे. आता आणखी किती वेळ द्यायचा? आता ते राहणारच नाही,तर त्यांना वेळ का द्यायचा? किती वेळ हे सरकार ठेवणार? गोरगरीब ओबीसींचे हाल होत आहेत. समाजातील प्रत्येक घटकाचे हाल झाले आहेत. त्यामुळे हे सरकार नेमकं काय करीत आहे, असा सवाल उपस्थित केला.

त्यांच्या वागण्यामुळे आम्ही नाराज

देवेंद्र फडणवीस आमचा शत्रू नाही, पण मराठा द्वेषामुळे आणि त्यांच्या वागण्याची विचित्र पद्धतीमुळे आम्ही त्यांच्यावर नाराज आहोत. माझ्यावर खोटा खटला दाखल केला. मराठवाड्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पोहचावा यासाठी आम्ही नाटक आणले होते, त्यात तोटा आला. आम्ही आमच्या परीने पैसे दिले, जबाबदारी वाटून घेतली. पण माझ्यावर देवेंद्र फडणवीस यांनी खोटा खटला दाखल केला, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला.

गिरीश महाजन यांना आव्हान

राज्यात ५० टक्क्यांपेक्षा अधिक मराठा समाज आहे. या समाजाला अनेक वर्षांपासून वेठीस धरण्याच काम केले गेले आहे. त्यामुळे आता किती दिवस सहन करायचे, आता लोक स्वतःच्या मुलांच्या बाजूने उभे राहणार आणि यांना दणादण पाडून टाकणार, आता यांना सोडणार नसल्याच सांगत महायुती सरकारवर त्यांनी टीका केली.जामनेरमध्ये एक लाख वीस हजार मराठा आहेत. आता बघतोच गिरीश महा, जनकडे इंगाच दाखवतो. या शब्दांत मनोज जरांगेने गिरीश महाजन यांना आव्हान दिले आहे.

logo
marathi.freepressjournal.in