देशभरासह महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असली तरीही अद्याप राज्यांमध्ये पावसाचा जोर कायम आहे. हवामान विभागाने येत्या २४ तासांमध्ये राज्यात मुसळधार रावसाची शक्यता वर्तवली आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीसह इतर भागात मुसळधार पावसाचा अंजाद हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण दिसून येईल. तसंच ठाणे मुंबई उपनगरासह राज्यात आज देखील पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्याच बरोबर राज्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.
बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या विविध भागात ४ ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ५ ऑक्टोबर नंतर आकाश अंशत: ढगाळ राहून हवामान कोरडे राहील. त्यामुळे पावसाची शक्यता कमी असणार आहे असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. या महिन्ता मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरवात होणार असून कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.