
मुंबई : पालघर स्थानकात लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या थांबविण्याची प्रवाशांकडून मागणी करण्यात येत होती. प्रवाशांची मागणी पूर्ण करण्यासाठी पश्चिम रेल्वेवरील रेल्वेगाड्यांना पालघर रेल्वे स्थानकात अतिरिक्त थांबा देण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे पालघरवासीयांना दिलासा आहे.
दोन रेल्वेगाड्यांना पालघर येथे अतिरिक्त थांबा देण्यात येणार आहे. गाडी क्रमांक २२९५५/२२९५६ वांद्रे टर्मिनस-भुज कच्छ एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक १२४९०/१२४८९ दादर-बिकानेर एक्स्प्रेसना पालघर स्थानकावर थांबा देण्यात येण्यास सुरुवात झाली आहे. गाडी क्रमांक २२९५५ वांद्रे टर्मिनस-भुज कच्छ एक्स्प्रेसला अतिरिक्त थांबा आहे. ही गाडी पालघर स्थानकावर सायंकाळी ७ वाजता पोहोचेल आणि सायंकाळी ७.०२ वाजता पालघरवरून सुटेल. रेल्वे दोन मिनिटे पालघरमध्ये थांबेल.