शिंदे गटाच्या आमदारांचं नक्की चाललंय तरी काय? पाचोऱ्यात पत्रकाराला शिवीगाळ, मुंबईत व्यावसायिकाचं अपहरण

शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलासह पंधरा जणांवर एका व्यावसायिकाला बेदम मारहाण करुन त्याचं अपहण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिंदे गटाच्या आमदारांचं नक्की चाललंय तरी काय? पाचोऱ्यात पत्रकाराला शिवीगाळ, मुंबईत व्यावसायिकाचं अपहरण

शिवसेना शिंदे गटाचे जळगावच्या पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांनी एका पत्रकाराला अश्लिल शिवीगाळ केल्याची घटना नुकतीच घडली. यानंतर त्या पत्रकाराला भर रस्त्यावर बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतं आहे. ही घटना ताजी असताना आता मुंबईत एक नवी घटना समोर आली आहे. मुंबईतील एका व्यावसायिकाचं अपहरण करुन त्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा देखील व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

मुंबईतील एका व्यावसायिकाचं अपहरण करुन त्यांना मारहाण केल्याची धक्कादाक घटना समोर आली असून या घटनेचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होतं आहे. याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांचे पुत्र राज सुर्वे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. काल(९ ऑगस्ट) रोजी मुंबई पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे आणि इतरांविरोधात गोरेवाग पूर्वमधील व्यापारी राजकुमार सिंग यांचं खंडणीसाठी अपहरण केल्याप्रकरणी वनराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी राज सुर्वे यांच्यासह पाच जणांची नावे दिली असून १०-१२ अज्ञात आरोपींचा देखील या FIR मध्ये उल्लेख आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोरेगावस्थित 'ग्लोबल म्युझिक जंक्शन' या कंपनीच्या कार्यलयात बुधवारी ही धक्कादायक घटना घडली. बुधवारी 'ग्लोबल म्युझिक जंक्शन'च्या कार्यालयात १० ते १५ जण आले आणि त्यांनी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजकुमार सिंग यांना बेदम मारहाण केली. यानंतर त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून सिंग यांचं अपहरण केलं. यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in