चारशे काय, दोनशेच्या पुढे जाणार नाहीत! -आदित्य ठाकरे

भाजपकडून चारशे पारचा नारा दिला जात आहे. मात्र, हे दोनशेच्या पण पार जाणार नाहीत, असा दावा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला
चारशे काय, दोनशेच्या पुढे जाणार नाहीत! -आदित्य ठाकरे

कर्जत : भाजपकडून चारशे पारचा नारा दिला जात आहे. मात्र, हे दोनशेच्या पण पार जाणार नाहीत, असा दावा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला. इंडिया आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारासाठी कर्जत तालुक्यात झालेल्या सभेत आदित्य यांनी हे वक्तव्य केले.

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा तिसरा टप्पा संपून आता चौथ्या टप्प्यातील प्रचार देखील थंडावणार आहे. त्यामुळे इंडिया आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारासाठी कर्जत तालुक्यात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. कर्जत शहरातील राजकीय इतिहास असलेल्या लोकमान्य टिळक चौकात ही सभा संपन्न झाली. यावेळी मंचावर शिवसेना ठाकरे गटाचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना उपनेते सचिन अहिर, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, सल्लागार बबन पाटील, शेकापचे जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील, उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, तालुकाप्रमुख उत्तम कोळंबे, काँगेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीरंग बरगे आदी उपस्थित होते.

या मावळ मतदारसंघात वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प येत होता. मात्र राज्यात सत्ताबदल झाला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंपनी सोबत बैठक घेतल्यानंतर तो प्रकल्प राज्याबाहेर गेला. खरे तर हा प्रकल्प येथे आला असता तर त्यासोबत पांढरा छोटे क्लस्टर निर्माण झाले असते आणि एक लाख तरुणांना रोजगार निर्माण झाला असता. माझा हट्ट इथल्या तरुणांच्या भविष्यासाठी आहे. वेदांताचा प्रकल्प राज्याबाहेर जात असताना विद्यमान खासदार कुठे होते? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.

आदित्य म्हणाले, 'काश्मीरमध्ये ३७० कलम हटवण्याला आपण सर्वानी पाठिंबा दिला. पण पाच वर्षे झाल्यानंतर तिथली परिस्थिती सुधारलेली नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in