SSC Result: बारावीचा निकाल लागला, दहावीचा कधी? शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिली माहिती

इयत्ता बारावीचा निकाल लागला आहे. निवडणुकांचे दिवस असतानाही एक आठवडा आधी बारावीचा निकाल लागला आहे. इयत्ता दहावीचा निकाल कधी लागणार याबद्दल शिक्षण मंत्र्यांनी माहिती दिली आहे.
when is ssc result know date and time
Published on

मुंबई : इयत्ता बारावीचा निकाल लागला आहे. निवडणुकांचे दिवस असतानाही एक आठवडा आधी बारावीचा निकाल लागला आहे. इयत्ता दहावीचा निकालही एक आठवडा आधीच म्हणजे २७ मे रोजी अपेक्षित असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

येत्या २४ तारखेपासून दहावीच्या प्रवेशाची ऑनलाईन माहिती भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. बारावीत जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत त्यांनी निराश होण्याचे कारण नाही. जुलै महिन्यात फेरपरीक्षा होणार असून त्याचे निकाल ऑगस्ट महिन्यात लागणार असल्याने त्यांनाही कॉलेज प्रवेश घेण्याची संधी मिळेल, असे केसरकर म्हणाले.

शाळांची वेळ बदलण्याच्या निर्णयाबाबत पुन्हा बैठक

लहान मुलांच्या आरोग्याच्या रक्षणासाठी पहाटेची शाळेची वेळ बदलून सकाळी ९ करण्यात आली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी तर होणार आहे, मात्र राज्याच्या काही भागांत विशेषत: शहरी भागात वाहतुकीच्या समस्या येत आहेत. याचा विचार करण्यासाठी आचारसंहिता संपल्यानंतर पुन्हा एकदा बैठक घेण्यात येणार असल्याचेही दीपक केसरकर यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in