मुख्यमंत्री सडक योजनेला निधी उपलब्ध कधी होणार? माजी आमदार पंडितशेठ पाटील यांचा सवाल

मागील सहा महिन्यांपासून मुख्यमंत्री सडक योजनेस कोणताही निधी उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे ठेकेदार यांची बिले रखडली आहेत. काम करून सुधा पैसे उपलब्ध होत नसताना मुख्यमंत्री सडक योजनेची नवीन कामे करण्यासाठी नारळ फोडले जात आहेत.
मुख्यमंत्री सडक योजनेला निधी उपलब्ध कधी होणार? माजी आमदार पंडितशेठ पाटील यांचा सवाल

मुरुड-जंजिरा : मागील सहा महिन्यांपासून मुख्यमंत्री सडक योजनेस कोणताही निधी उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे ठेकेदार यांची बिले रखडली आहेत. काम करून सुधा पैसे उपलब्ध होत नसताना मुख्यमंत्री सडक योजनेची नवीन कामे करण्यासाठी नारळ फोडले जात आहेत. हे कितपत योग्य आहे. सुरुवातीची कामे मंजूर असून, राज्य शासनाने सर्वप्रथम या कामांना निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी माजी आमदार पंडितशेठ पाटील यांनी केली आहे.

मुरुड येथे ते एका कार्यक्रमासाठी आले असताना ते पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी माजी आमदार पंडितशेठ पाटील यांनी सांगितले की,मुख्यमंत्री सडक योजनेला पुरेसा निधी मिळत नसल्याने रायगड जिल्ह्यामधील बहूतांशी कामे रखडली असल्याने मुख्यमंत्री सडक योजनेची कामे रेंगाळली आहेत. काही कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत, तर बरीचशी कामे निधी मिळत नसल्याने रखडली आहेत. निधी प्राप्त होत नसल्याने गावातील रस्ते रखडले व या रस्त्यांना मुख्य रस्त्याशी जोडता येत नाही. मुख्यमंत्री सडक योजनेचे पैसे आण्यासाठी विद्यमान लोकप्रतिनिधी कोणताही प्रयत्न न करीत असल्यामुळे रायगड जिल्ह्यातील मुख्यमंत्री सडक योजनेची कामे रखडली आहेत.

मुंबईमधील मुख्यमंत्री सडक योजनेच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता, तेव्हा तेथील अधिकारी वर्गांनी सांगितले होते की, हिवाळी अधिवेशन संपल्यावर पैसे वितरित करण्यात येतील, परंतु हिवाळी अधिवेशन संपून दोन महिने झाले, तरी अद्याप या योजनेसाठी पैसे उपलब्ध होऊ शकलेले नाहीत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in