खंडणीतील १५ हजार स्वीकारताना, तिघे पोलिसांच्या जाळ्यात

खंडणीतील १५ हजार स्वीकारताना, तिघे पोलिसांच्या जाळ्यात

ग्रामपंचायतमधील विकासकामात दोन पत्रकार व एका कार्यकर्त्याने तक्रारदाराकडे दोन लाख रुपये खंडणीची मागणी केली होती.

नांदेड : ग्रामपंचायतमधील विकासकामात दोन पत्रकार व एका कार्यकर्त्याने तक्रारदाराकडे दोन लाख रुपये खंडणीची मागणी केली होती. तडजोडीनंतर अंतिम १ लाख ३० हजार रुपये देण्याचे ठरले. यातील पहिला हप्ता १५ हजार स्वीकारताना तिघांना पोलीसांनी रंगेहात पकडले आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. १७) खंडणीविरोधी पथकाने केली आहे. संजय सुदाम कांबळे, विजय बनसोडे व पिराजी खंडु गवलवाड असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तक्रारदार डॉ. प्रवीणकुमार रामराव गव्हाणे (रा. माकणी, ता. मुखेड) यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली होती. पत्रकार संजय सुदाम कांबळे व माकणी येथील कार्यकर्ता पिराजी खंडु गवलवाड यांनी त्यांना मुखेड येथे भेटुन तक्रारदार यांची पत्नी व माकणी येथील विद्यमान सरपंच अनिता गव्हाणे या ग्रामपंचायतचे माध्यमातुन कोट्यावधी रुपयांची कामे करीत असल्याने त्या कामासंबंधाने वरिष्ठांकडे तक्रार न करण्यासाठी व पेपरमध्ये बातमी छापुन बदनामी न करण्यासाठी पत्रकार विजय बनसोडे यांचे मध्यस्थिने दोन लाख रुपयाची खंडणीची मागणी केली. वरिष्ठांच्या आदेशावरून खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक, जगदीश भंडरवार व पोलीस उपनिरीक्षक दशरथ आडे यांनी १७ रोजी सांयकाळी दोन पंचा समक्ष पडताळणी करण्यासाठी सापळा लावला होता

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in