संसदेमध्ये महाराजांबद्दल बोलत असताना माईक केला बंद ; अमोल कोल्हे आक्रमक, पाहा संपूर्ण व्हिडिओ

पहिली एक-दोन वाक्ये बोलल्यानंतर त्याचा माईक बंद करण्यात आला. यावर खासदार अमोल कोल्हे यांनी नाराजी व्यक्त केली
संसदेमध्ये महाराजांबद्दल बोलत असताना माईक केला बंद ; अमोल कोल्हे आक्रमक, पाहा संपूर्ण व्हिडिओ

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ.अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना आज संसदेत बोलण्याची संधी देण्यात आली. मात्र, पहिली एक-दोन वाक्ये बोलल्यानंतर त्याचा माईक बंद करण्यात आला. यावर खासदार अमोल कोल्हे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अमोल कोल्हेसोबत घडलेल्या प्रकाराचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे. त्यात अमोल कोल्हे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलण्यासाठी वेळ देण्यात आली. महाराजांबद्दल अपमानास्पद बोलणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कायदा करावा, अशी मागणी ते करणार होते.

माईक बंद केला तरी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची भावना दाबता येणार नाही. आमचा माईक बंद केला तरी शिवभक्तांचा आवाज आम्ही रोखू शकणार नाही, असे म्हणत कोल्हे यांनी विधानसभा अध्यक्षांकडे नाराजी व्यक्त केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in