भारत राष्ट्र समिती पक्षाचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आज सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने त्यांनी आपल्या मंत्रिमंडळ, आमदार आणि खासदार यांच्यासह शेकडो गाड्यांच्या ताफा आणून महाराष्ट्रात शक्तीप्रदर्शन केलं असल्याची टीका राज्याच्या राजकीय वर्तूळातून केली आहे. केसीआर यांनी आज पंढपूर येथे विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं. यानंतर त्यांनी सरकोली गावात जाहीर सभा घेतली. या सभेत भगीरथ भालके यांच्या त्यांच्या समर्थकांसह बीआरएसमध्ये जाहीर प्रवेश संपन्न झाला. तसंच केसीआर यांनी महाराष्ट्रातील राजकीय पक्षांवर टीका केली.
यावेळी बोलताना केसीआर म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून मला एक गोष्ट खटकते. आज देशाचं ध्येय काय आहे? काही आहे की विना ध्येयाचेच आपण भटकत आहोत? काय चाललय या देशात? यावर प्रत्येक भारतीयानं विचार करायला हवा. भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष उलटली. हा काही कमी काळ नसल्याचं के चंद्रशेखर राव यांनी म्हटलं आहे.
यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील पक्ष आणि नेत्यांना चांगलच धारेवर धरलं. यावेळी बोलताना केसीआर म्हणाले की, "इथले राजकारणी मला म्हणताय इथे या, दर्शन घ्या, पण राजकारण करु नका. मला कळत नाही. मी आता कुठे महाराष्ट्रात सुरुवात केली आहे. पण या सगळ्यांमध्ये एवढी भीती का आहे? एवढ्या छोट्या पक्षासाठी एवढा गोंधळ का घालताय" असं केसीआर म्हणाले आहेत.
कोणताच पक्ष आम्लाला सोडत नसल्याचं म्हणात त्यांनी काँग्रेस आम्हाला भाजपची 'बी' टीम म्हणतय तर भाजप काँग्रेसची 'ए' टीम, असं म्हणत या टीम कुठून येताय असा सवाल केला आहे. आम्ही शेतकरी , मागासवर्गाची टीम आहोत. बीआरएस हा एकमेव पक्ष आहे ज्याने 'अबकी बार, किसान सरकार' अशी घोषणा केली. आता या लोकांना भीती वाटत आहे. शेतकरी बीआरएसशी जोडले जात असल्याने हे सर्व बोलल जात असल्याचं केसीआर म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी बीआरएस फक्त तेलंगणा आणि महाराष्ट्र या राज्यापर्यंत मर्यादित पार्टी नसल्याचं केसीआर यांनी म्हटलं आहे.