आम्हाला बैठकीपासून 'वंचित' का ठेवलं?

देशात आणि महाराष्ट्रात भाजप आणि आरएसएसला पराभूत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने लवचिक भूमिका घेऊन महाविकास आघाडीसोबत समझोता केलेला आहे.
आम्हाला बैठकीपासून 'वंचित' का ठेवलं?

प्रतिनिधी/मुंबई : काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथाला आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीमध्ये लोकसभा जागावाटप, तसेच राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. मात्र, या बैठकीला वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रतिनिधी हे उपस्थित नव्हते. यावर वंचित बहुजन आघाडीने ट्विटरच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला आहे.

देशात आणि महाराष्ट्रात भाजप आणि आरएसएसला पराभूत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने लवचिक भूमिका घेऊन महाविकास आघाडीसोबत समझोता केलेला आहे. सत्ता परिवर्तनासाठी चर्चा पुढे जात असताना समन्वयाने महत्त्वाचे निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.

वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांना या बैठकीपासून 'वंचित' का ठेवलं ? असा सवाल वंचितने उपस्थित केला आहे. दरम्यान, काँग्रेसने २४ आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी २३ जागांची मागणी केल्याची बातमी पसरली असून, ही माहिती खरी आहे का? अशीही विचारणा वंचित बहुजन आघाडीने केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in