वन्यजीव सप्ताह 2023 : पॉज संस्थेने वाचवले 4000 हून अधिक वन्य जीवांचे प्राण

संस्थेने आतापर्यंत 1132 साप, 2485 पक्षी, 13 माकडे, 3 कोल्हे, 65 कासवे, 31सरपटणारे प्राणी, 27 खारी, वटवाघूळ, विंचू अशा वन्यजीवांची सुटका आणि पुनर्वसन केले आहे.
वन्यजीव सप्ताह  2023 :  पॉज संस्थेने वाचवले 4000 हून अधिक वन्य जीवांचे प्राण

गेल्या 23 वर्षात कुठे साप घरात घुसला असो की घोरपड, कुठे कबुतर अडकले असेल तर कुठे मांजात अडकलेला पक्षी, कधी हरीण जखमी मिळते तर मोर आढळून येतो - पण पॉज संस्थेला आलेला कॉल नेहमी स्वीकारला जातो. संस्थेचे कार्यकर्ते वर्षाचे 365 दिवस अहोरात्र पशु-पक्ष्यांची काळजी घेण्यात मग्न असतात. मागील 23 वर्षात पॉज संस्थेने आतापर्यंत 1132 साप, 2485 पक्षी, 13 माकडे, 3 कोल्हे, 65 कासवे, 31 विविध सरपटणारे प्राणी ज्यात घोरपड, पाली , रंग बदलणारे सरडे, इत्यादी, 27 खारी, वटवाघूळ, विंचू इत्यादी वन्यजीवांची सुटका आणि पुनर्वसन केले आहे.

ठाणे जिल्ह्यातील सर्वात जास्त पक्षी पॉज संस्थेकडे पुनर्वसन साठी येतात. त्यामध्ये पाण्याजवळील पक्षी, शहरी पक्षी, जंगली पक्षी, गवताळ पक्षी ह्यांचा समावेश असतो. अगदी स्थलांतरित पक्षी जसे फ्लेमिंगो, चातक, तीन बोटी खंड्या असे दुर्मिळ पक्षी देखील पॉज संस्थेने पुनर्वसीत केले आहेत. विविध बदके, बगळे, सागरी ससाणे ते अगदी शहरातील कावळे, चिमण्या, कबुतर, मैना, घारी, कोकिळा ह्यांना वेळोवेळी वाचवले आहे. प्रत्येक प्रजनन काळात संस्थेने छोट्या पिल्लांना त्यांचा घरट्यात सोडण्याचे काम केले आहे आणि कधी पक्ष्यांची कॉलनि जर झाड पडल्याने विखरली गेली असेल तर फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि एस पी सी ऍ च्या मदतीने हॉस्पिटलमध्ये दखल ही केले आहेत. वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टर च्या मदतीने विविध पक्ष्यांच्या वर उपचार ही केले आहेत. नुसते स्थलांतरित आणि देशी पक्षी पॉज मध्ये येत नाहीत तर विदेशी ( एक्सओटीक) पक्षी देखील संस्थैत येतात. अगदी लवबर्ड ते टर्की आणि आफ्रिकन पोपट सुद्धा लोक आणून देतात. कधी पिंजरा उघडून पळून गेलेले पक्षी सुद्धा येतात. त्या पक्ष्यांना पुनर्वसन केंद्रात पाठवले जाते तर लहान पिलाला तात्पुरते पालक ही दिले जातात. संस्थेच्या सदस्या सौ शिल्पा हरकरे ह्या स्वतः लहान पिल्लांना जेवण भरवून ते उडेपर्यंत सांभाळ करतात तसेच सयंसेवक ऋषी सूरसे हे सर्प पुनर्वसन चे काम करतात. बाकीचे वन्यजीव राज मारू, देवेंद्र निलाखे, सुष्मीत कविस्कर करतात. बरेच वेळा संस्थे कडे अवैध रित्या पकडलेले पक्षी देखील येतात आणि संस्थेचे कार्यकर्ते पुढील पुनर्वसन ठरवतात आणि मदत करतात.

विविध साप आणि सरपटणारे प्राणी वाचवण्यासाठी संस्थेकडे विशेष हेल्प लाईन आहे ( 9920777536 ) त्यामधून नाग, फुरसे, मण्यार, घोणस हे विषारी साप तसेच नेहमी आढळणारे धामण, कवड्या, नानेट्या ह्यांचे रिलोकेशन केले जाते. आतापर्यंत बरयाच घोरपडी, पाली, रंग बदलणारे सरडे संस्थेने पुन्हा निसर्गात सोडले आहेत. पॉज संस्थेकडे ठाणे जिल्ह्यातील सर्वात जास्त साधने उपलब्ध आहेत आणि त्यातील बरीच साधने ही स्कॉटलंड, इंग्लंड, अमेरिका येथून आयात केले आहेत. 2010 मध्ये पॉज संस्थेने डोंबिवली मधील सर्पमित्रांची एक सभा देखील आयोजित केली होती तर 2018 मध्ये निलेश भणगे ह्यांनी सर्प विषयक डेटा वर सर्प संमेलन मध्ये प्रेझेंटेशन ही दिले होते.

संस्थेचे निलेश भणगे यांनी 2005 पासून पाळीव हत्ती ह्या विषयावर संशोधन केले असून महाराष्ट्र आणि गोव्यातील पाळीव हत्तींचा अभ्यास करून कोर्टामध्ये रिपोर्ट सादर केले आहेत. रीसर्चचे 5 रिपोर्ट प्रसिद्ध ही झाले आहेत. यात सर्कशीतील हत्ती, मंदिरातील हत्ती, रस्त्यावरील हत्ती, झू मधील हत्ती आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट मधील हत्तींचा समावेश आहे. आज त्या प्रयत्नांनी रस्त्यावर भीक मागून फिरणारे हत्ती आता बंद झाले आहेत. संस्थेला वन्यजीवसाठी देखील कॉल येतात ह्यात हरिण, माकड, कोल्हे , ससे, खारी, वटवाघूळ इत्यादी वन्यप्राणी ह्यांची सुटका आणि उपचार केले आहेत. संस्थेकडे वन्यजीवांची ने-आन करण्यासाठी 1 रुग्णवाहिका देखील आहे.

निलेश भणगे ह्यांनी वाईल्ड अनिमल रेसक्यू नेटवर्क या आशियातील मोठ्या कॉन्फरन्समध्ये वेळोवेळी सहभाग घेऊन आपल्या कामाचं प्रझेंटेशन दिलं आहेत. 2005 साली फॉरेस्ट डिपार्टमेंट बरोबर कारवाई करून ठाणे जिल्ह्यातील सर्व गारुडी आणि मदारी कडून साप हस्तगत करून त्यांना मेटल आणि मातीचे साप देऊन पुनर्वसन देखील संस्थने केले आहे. 2004 मध्ये नॅशनल सर्कस मधील 12 सिंह आणि 2 वाघ ह्यांची सुटका पेटा ह्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या मदतीनं करुन त्यांना बाणेरघट्ट बंगलोर येथे पाठवले आहे. संस्थेच्या वतीने विविध शाळा रोटरी क्लब, कॉलेज मधून सर्प विषयी व्याख्यान हे मंदार सावंत आणि चैतन्य कीर ह्यांनी दिले आहेत.

प्रख्यात फोटोग्राफरने भारतभर हिंडून काढलेले वन्यजीवांचे निसर्गातील फोटोंचे प्रदर्शन संस्थेमार्फत दरवर्षी भरवलं जातं. यात सुमारे 40 फोटोग्राफरने काढलेले सुमारे 300 फोटोंचा चालताफिरता संग्रह देखील पॉज संस्थेकडे आहे. विविध पक्षी निरीक्षणचे वेळोवेळी कॅम्प देखील संस्था आयोजित करते. स्वतः निलेश हे फोटोग्राफर असून त्यांनी अंदमान निकोबार पासून ते अगदी नेपाळ, हॉंगकॉंग, थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया येथे जाऊन फोटोग्राफी आणि अभ्यास केलेला आहे. थायलंड येथे होणाऱ्या दरवर्षीच्या पक्षी स्थलांतरात पक्षीगणना, बर्ड बॅडिंगमध्ये सहभाग केला आहे. वन्यजीव सुरक्षा कायदा 1972 बद्दल लोकांमध्ये जागरूकता करण्याचे काम संस्था गेली 23 वर्षे अविरतपणे करत आहे. या कामात सध्याचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर श्री चेने आणि श्री नातू ह्यांचे मार्गदर्शन मिळत आहे.

logo
marathi.freepressjournal.in