Maratha Reservation:अजित पवारांचे आमदार देतील का राजीनामा ? 
आणखी दोन शिलेदार सोडणार आपले पद....

Maratha Reservation:अजित पवारांचे आमदार देतील का राजीनामा ? आणखी दोन शिलेदार सोडणार आपले पद....

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या अमरण उपोषणाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे.
Published on

राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाकडून दिवसरात्र आंदोलन केलं जातं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या अमरण उपोषणाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. राज्यातील अनेक गावात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी केली जातं आहे. यामुळे मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारवर दबाव वाढताना दिसत आहे. यादरम्यान, शिंदे गटाचे हिंगोली-उमरखेड मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली मी होती. यानंतर अजित पवार गटातून देखील दोन आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची बातमी समोर आली आहे.

शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांनी देखील राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे. तालुक्यातील समाज बांधव आणि मराठा समाजाच्या संघटना जसं सांगतील तसा निर्णय मी घेणार आहे, असं अतुल बेनके म्हटलं आहेत. अजित पवार गटाचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी देखील राज्याचं राजकारण हे पूर्णतः मराठा समाजाच्या हातामध्ये होतं. केंद्रामध्ये देखील मराठा समाजाचे कित्येक मंत्री होते. पण आम्ही कधी मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी भूमिका घेतली नाही. त्यामुळे मराठा समाजाकडून होणारी राजीनाम्याची मागणी ही योग्य आहे, असं मत दिलीप मोहिते पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

राज्यातील मराठा समाजाची भावना लक्षात घेऊन आमच्यामधील काही नेत्यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे, असंही मोहिते पाटील म्हटलं. या बद्दलच सविस्तर वृत्त 'साम टीव्ही'ने दिलं आहे. तसंच मराठा आरक्षणासाठी जे खासदार आहेत त्यांनी संसदेत, आणि आमदारांनी विधानसभेत आवाज उठवावा. पण फक्त लोकांच समाधान व्हावं, तसं बोलून राजीनामा देण्याची भाषा करावी आणि भुमिका वेगळी घ्यावी हे आम्हला पटत नाही. आमदारकी आणि खासदारपदाचा राजीनामा देणाऱ्या नेत्यांना संधीसाधुची उपमा देत दिलीप मोहिते पाटीलांनी निशाना साधला.

logo
marathi.freepressjournal.in