ओबीसींचे आरक्षण काढून मराठा समाजाला देणार का? चंद्रशेखर बावनकुळे यांचे खुले आव्हान

ओबीसींच्या आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देणार का, हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जाहीर करावे.
चंद्रशेखर बावनकुळे
चंद्रशेखर बावनकुळे
Published on

मुंबई : ओबीसींच्या आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देणार का, हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जाहीर करावे. तसेच आपल्या विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यात महाविकास आघाडीने असे लेखी आश्वासन द्यावे, असे खुले आव्हान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी दिले. ते भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. रावसाहेब दानवे, श्रीकांत भारतीय, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यावेळी उपस्थित होते.

मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच पाहिजे, पण ते ओबीसींचे नुकसान करून नाही अशी भाजप ची स्पष्ट भूमिका आहे. महाविकास आघाडीने आरक्षणाबाबत नेहमीच दुटप्पी भूमिका घेतली आहे, असा टोला बावनकुळे यांनी लगावला.

मविआचे सरकार आल्यास योजना बंद - महायुतीला भीती

आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी दिलेले एक मत हे राज्यातील १४ कोटी जनतेचे नुकसान करणार आहे. मोदी सरकारच्या लोककल्याणकारी योजनांना राज्यात खीळ घालणे आणि त्या योजनांचा लाभ राज्यातील जनतेला घेऊ द्यायचा नाही हा एकमेव अजेंडा मविआचा आहे. मविआ सरकार सत्तेत आले तर महायुती सरकार आणि केंद्राच्या योजनांना राज्यात खोडा घालून लाडकी बहीण योजना, तीन सिलिंडर योजना, वीजबिल माफी, पीकविमा योजना, गरीब अन्न योजना, आवास योजना यासारख्या योजना बंद करेल, त्यामुळे मतदारांनी सावध रहावे, असेही ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in