तोडगा निघणार? राज्य सरकारचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटी गावाकडे रवाना

राज्य सरकारचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत जाऊन उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या इतरांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करणार आहे
तोडगा निघणार? राज्य सरकारचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटी गावाकडे रवाना

जालनाच्या अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. यासाठी सोमवारी मुंबईत काही बैठका देखील घेण्यात आल्या. तर आज राज्य सरकारचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत जाऊन उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या इतरांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करणार आहेत. मुंबईहून निघालेलं हे शिष्टमंडळ औरंगाबाद विमानतळावर दाखल झालं आहे. येथून हे शिष्टमंडळ कारने जालन्यातील अंतरवाली सराटी गावाकडे रवाना झालं आहे.

या शिष्टमंडळात रोहयो मंत्री संदिपान भुमरे, आरोग्यमंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांचा समावेश आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्याशी हे शिष्टमंडळ चर्चा करणार आहे. यापूर्व देखील गिरीश महाजन यांना पाठवून जरांगे यांच्याशी चर्चा करण्यात आली होती. त्यात मनोज जरांगे आपल्या निर्णयावर ठाम होते. त्यामुळे आज दुसऱ्यांदा हे शिष्टमंडळ अंतरवाली सराटी गावात जात आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावर काही तोडगा निघणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या उपोषण पोलिस बळाच्या जोरावर उधळून लावण्याचा प्रयत्न सरकारने केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. याठिकाणी आंदोलकांवर पोलिसांकडून अमानुष लाठीचार्ज केला गेला होता. याबाबता व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर राज्यभरातील मराठा समाजात सरकारविरोधता तीव्र संतापाची लाट उसळली होती. आंदोलकांकडून देखील गडगफेक झाल्याचा दावा राज्यकर्त्यांकडून करण्यात आला होता. आज राज्य सरकारचे शिष्टमंडळ पुन्हा याठिकाणी जात असल्याने आंदोलकांनी शिष्ठमंडळाला अडवू नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in