उत्तर भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार - अतुल लोंढे

उत्तर भारतीय बांधवांना लाठ्याकाठ्यांनी मारणाऱ्या राज ठाकरेंना सोबत घेऊन भारतीय जनता पक्ष कोणत्या तोंडाने उत्तर भारतीयांची मते मागणार आहे? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उपस्थित केला आहे.
उत्तर भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार - अतुल लोंढे

मुंबई : भारतीय जनता पक्षाने राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महायुतीत घेऊन भाजपने उत्तर भारतीय बांधवांचा फक्त विश्वासघातच केला नाही तर त्यांच्या जखमेवर मीठ चोळून त्यांच्या स्वाभिमानाला धक्का लावला आहे. उत्तर भारतीय बांधवांना लाठ्याकाठ्यांनी मारणाऱ्या राज ठाकरेंना सोबत घेऊन भारतीय जनता पक्ष कोणत्या तोंडाने उत्तर भारतीयांची मते मागणार आहे? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उपस्थित केला आहे.

लोंढे म्हणाले की, छट पूजेला विरोध करणारे, उत्तर भारतीयांना मारहाण करणारे राज ठाकरे यांच्या मनसेला निवडणुकीसाठी महायुतीत घेत आहे, हा तमाम हिंदी भाषकांचा अपमान आहे. ज्या पक्षाकडे एखादा आमदार आहे त्यांना सोबत घेण्याची गरजच का पडावी? भाजपने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कटकारस्थान करून पाडले, त्यानंतर उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष व चिन्हही चोरले, शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही फोडला, एवढे करूनही भाजपला महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक अवघड जात आहे हे दिसल्यानेच त्यांना दुसरा ठाकरे उभा करावा लागतो एवढी नामुष्की भाजपवर आलेली आहे, असाही दावा अतुल लोंढे यांनी यावेळी केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in