भाजपच्या वाढत्या ताकदीने राष्ट्रवादीचा काढता पाय; जळगाव जिल्ह्यात शरद पवार गटाचा सुस्कारा

जळगाव जिल्ह्यात भाजपाची ताकद ही वाढत असून ही वाढती ताकद पाहता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपबरोबर लढत देऊन पराभव पत्करण्यापेक्षा ठाकरे गटाला जागा सोडून काढता पाय घेण्यात शहाणपणा दाखवला आहे.
भाजपच्या वाढत्या ताकदीने राष्ट्रवादीचा काढता पाय; जळगाव जिल्ह्यात शरद पवार गटाचा सुस्कारा
(संग्रहित छायाचित्र)

जळगाव : जळगाव जिल्ह्यात भाजपाची ताकद ही वाढत असून ही वाढती ताकद पाहता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपबरोबर लढत देऊन पराभव पत्करण्यापेक्षा ठाकरे गटाला जागा सोडून काढता पाय घेण्यात शहाणपणा दाखवला आहे. त्यामुळे शरद पवार गटाच्या जिल्ह्यातील नेत्यांनी सुस्कारा टाकला आहे .

१९९० पासून जळगाव जिल्हयात भाजपाची ताकद ही वाढत गेली. ती वाढवण्यात तत्कालीन भाजपा नेते एकनाथ खडसे यांचे पासून अनेक नेत्यांचे योगदान होते. यातून लोकसभेच्या जिल्हयातील दोनही जागा सातत्याने भाजपने जिंकून घेण्यास सुरुवात केली होती. शरद पवारांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केल्यानंतर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस रूजवत असताना भाजपविरोधात उमेदवार देण्याचा प्रयत्न केला. सातत्याने जिल्हयात राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा बरोबर लढत होत होती. २००९, २०१४, २०१९ या तीनही निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला जळगाव लोकसभा मतदारसंघात पराभवाला सोमोरे जावे लागले.वसंतराव मोरे , सतीश पाटील , गुलाबराव देवकर यांनी हे पराभव पचवले. रावेर मतदारसंघात देखील २०१४ मध्ये राष्ट्रवादीचे मनीष जैन यांना पराभव पत्करावा लागला .

जिल्ह्यात आपले अस्तित्व नसलेल्या काँग्रेसने रावेर लोकसभा मतदारसंघात सातत्याने येथे भाजपा समोरासमोर मोठ्या संख्येने हार पत्करली होती. तरी देखील या मतदारसंघात आपली स्थिती चांगली असल्याचा दावा महाविकास आघाडीत काँग्रेस करत होती. मात्र वरिष्ठ नेत्यांना शहाणपण सुचून त्यांनी रावेरची जागा ही शरद पवार गटाला सोडलली तर जळगाव लोकसभा मतदारसंघात टिकाव लागत नसल्याने शरद पवारांनी ही जागा ठाकरे गटाला सोडत येथून काढता पाय घेतला. जळगाव मतदारंघातील चार आमदार हे शिंदे गटाला जाऊन मिळाले आहेत. त्यामुळे शिवसेनेची ताकद संपलेली आहे अशा स्थितीत या मतदारसंघात ठाकरे गट निवडणुक लढवू इच्ठीत आहे. नवे चिन्ह आणि प्रथमच लोकसभा निवडणुक जिल्हयात ठाकरे गट लढवत असून किमान चिन्ह लोकांपर्यंत पाहचेल एवढीच किमान अपेक्षा हा गट ठेवून आहे. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने ठाकरे गटाला जागा देऊन शहाणपणच दाखवल्याची चर्चा आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in