प्रियकराच्या हत्याप्रकरणात आरोपी महिलेला जामीन

पोलीस खात्यात आलेल्या शिवशंकर गायकवाड आणि मोनाली गायकवाड आपल्या दोन मुलींसह पोलीस क्वार्टर्स येथे राहत होते.
प्रियकराच्या हत्याप्रकरणात आरोपी महिलेला जामीन

मुंबई : सोलापूर येथील प्रियकर असलेल्या मिरची व्यापाऱ्याच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी महिलेला उच्च न्यायालयाने दोन वर्षांनंतर दिलासा दिला. न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांनी आरोपी ही महिला असून, गेली दोन वर्षे कोठडीत आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण झालेला आहे आणि खटल्याच्या निर्णयायाला होणारा विलंब पाहता आरोपीला आणखी कोठडीत ठेवण्याची आवशकता नाही, असे स्पष्ट करत महिला आरोपी मोनाली शिवशंकर गायकवाड हिची जामिनावर सुटका केली.

पोलीस खात्यात आलेल्या शिवशंकर गायकवाड आणि मोनाली गायकवाड आपल्या दोन मुलींसह पोलीस क्वार्टर्स येथे राहत होते. पतीच्या त्रासाला कंटाळून मोनालीने पती विरोधात तक्राार दाखल करून ती २०१९ मध्ये माहेरी सोलापूरला निघून गेली. तेथे तिचा मित्र दाद जगदाळे भेटला. त्यानंतर २०२१मध्ये पती ब बरोबर तडजोड करून पुन्हा तिने संसार थाटला. त्यानंतर दादा जगदाळेचे आरोपी महिलेला भेटण्यासाठी मुबईत येणे जाणे सुरू झाले. पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरून एके दिवशी शिवशंकरने दादा जगदाळेला मुंबई येथे बोलावून घेतले आणि पत्नी समोरच त्याची कोयत्याने वार करून हत्या केली. मुंडके कापून डोके नसलेला मृतदेह अँटॉप हिल येथील सीजीएसटी क्वार्टरच्या बाहेर फेकून दिला या प्रकरणी पोलिसांनी ९ ऑक्टोबर २०२१ ला शिवशंकर गायकवाड आणि मोनाली गायकवाड अटक केली. या प्रकरणी जामीनासाठी मोनालीने ॲड. ओंकार चितळे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

त्या याचिकेवर न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या समोर सुनावणी झाली. यावेळी ॲड. चितळे यांनी या हत्येत आरोपीचा सहभाग नव्हता, असा दावा केला. आरोपीने आपज्या पतीला रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या झटापटभत आरोपी कुऱ्हाडीचे वार लागून जखमी झाली. याकडे न्यायालयाचे लक्ष वेधताना अर्जदाराच्या मुलीचे व शेजाऱ्यांचा जबाब आणि अर्जदाराच्या दुखापतीचे दाखले न्यायालयात सादर केले. तसेच घडलेल्या प्रकाराने आरोपी घाबरली होती त्यामुळे पतीच्या भितीपोटी जाबाब दिला नाही. पोलिसांचाही जबाब नोंदविला नाही. याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले.

दोन्ही युक्तीवादानंतर न्यायालयाने अन्य गोष्टींचा विचार न करता आरोपी ही महिला आहे. ती दोन वर्षे कोठडीत आहे. तपास पूर्ण झालेला असल्याने आणखी कोठडीत ठेवण्याची आवश्यक्ता नाही, असे स्पष्ट करून जामीन मंजूर केला.

logo
marathi.freepressjournal.in