पुण्यातील फेमस 'हॉटेल वैशाली'बाबत महिलेचा धक्कादायक दावा ; म्हणाली, "बंदुकीच्या..."

जून २०१८ पासून ते आतापर्यंत वेळोवेळी हा प्रकार घडल्याचे महिलेने शिवाजीनगर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे
पुण्यातील फेमस 'हॉटेल वैशाली'बाबत महिलेचा धक्कादायक दावा ; म्हणाली, "बंदुकीच्या..."

पुण्यातील फेमस वैशाली हॉटेल वादात सापडले आहे. बंदुकीच्या धाक दाखवलत हॉटेलचा ताबा घेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा एका महिलेने केला आहे. हॉटेचे महत्वाचे कागदपत्र बंदुकीच्या धाकाने नावावर करुन घेतल्याचा आरोप एका महिलेने तिच्या पतीवर केला आहे. याप्रकरणी पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्वजीत विनायक जाधव, अभिजित विनायक जाधव, वैशाली विनायक जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. जून २०१८ पासून ते आतापर्यंत वेळोवेळी हा प्रकार घडल्याचे महिलेने शिवाजीनगर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे.

फिर्यादिला पती विश्वजीत याने धमकावून तसंच दारु पाजून तिच्यावर अत्याचार केले. बंदुकीचा धाक दाखवून जबरदस्तीने हॉटेल वैशालीचे कुलमुख्यातरपत्र नावार करुन घेतले. तसंच फिर्यादी महिलेच्या नावावर असलेल्या चार महागड्या मोटारींची आरोपीने परस्पर विक्री केली. तसंच एक कोटी ७० लाख रुपयांचे दागिने आणि दोन महागड्या मोटारी आरोपी आणि त्याचा भाऊ वापरत असल्याचे या फिर्यादीत म्हटलं आहे.

पुण्याचा शिवाजीनगर पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक विक्रम गौड या प्रकरणाता तपास करत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in