खान्देशातील चारही मतदारसंघांत महिला उमेदवार; महिलांंना उमेदवारी देताना आखडता हात घेतल्याचा राजकीय पक्षांचा इतिहास

खान्देशात फैजपूरला काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन १९३६ मध्ये झाले. नंतर खऱ्या अर्थाने देशात काँग्रेस ग्रामीण भागात रुजली. या अधिवेशनात देखील महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. असे असले तरी काँग्रेसला मात्र निवडणुकीत उमेदवारी देताना आजपर्यंत महिलांना प्राधान्य द्यावेसे वाटले नाही.
खान्देशातील चारही मतदारसंघांत महिला उमेदवार; महिलांंना उमेदवारी देताना आखडता हात घेतल्याचा राजकीय पक्षांचा इतिहास

विजय पाठक / जळगाव

महिला आज सर्वच क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवत असताना राजकीय पक्षांनी मात्र त्याची उमेदवारी देताना फारशी दखल घेतली नाही. महिलांना उमेदवारी देण्यात पक्षांनी नेहमीच हात आखडता घेतला आहे. मात्र यावेळी खान्देशात चारही मतदारसंघांत महिला उमेदवार दिसून येत आहेत.

खान्देशात फैजपूरला काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन १९३६ मध्ये झाले. नंतर खऱ्या अर्थाने देशात काँग्रेस ग्रामीण भागात रुजली. या अधिवेशनात देखील महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. असे असले तरी काँग्रेसला मात्र निवडणुकीत उमेदवारी देताना आजपर्यंत महिलांना प्राधान्य द्यावेसे वाटले नाही.

खान्देशात रावेर, जळगाव, धुळे, नंदुरबार हे चार लोकसभा मतदारसंघ येतात. भाजपने रावेर येथे रक्षा खडसे तर नंदुरबार येथे हिना गावीत यांना यापूर्वी उमेदवारी दिली आहे. यंदा मात्र रावेरला रक्षा खडसे, जळगाव मतदारसंघात स्मिता वाघ, आणि नंदुरबारमध्ये हिना गावीत यांना भाजपाने उमेदवारी दिली तर गेल्या ७२ वर्षांत प्रथमच धुळे मतदारसंघात एका महिलेला उमेदवारी मिळाली आहे.

काँग्रेसने डॉ. शेाभा बच्छाव यांना उमेदवारी दिली आहे. धुळ्यात विविध राजकीय पक्षांनी आतापर्यंत पुरुषांनाच उमेदवारी दिली पण महिलेला उमेदवारी मिळण्यासाठी ७२ वर्ष वाट पहावी लागली. आज भाजप आणि काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांनी महिलांच्या कर्तृत्वावर विश्वास टाकत रावेर, जळगाव, नंदुरबार आणि धुळ्यात महिलांना उमेदवारी दिली.

logo
marathi.freepressjournal.in